दिव्य औषधी- पांढरी मुसळी
जगातील एकूण उत्पादनाच्या सहा ते सात पट जास्त मागणी असलेली आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणजे पांढरी मुसळी होय. पांढऱ्या मुसळीचे शास्त्रीय नाव – Chlorophytum borivillanum , कुळ- Liliaceae , मराठी नाव- पांढरी मुसळी,सफेदा हिंदी नाव- सफेद मुसली, धोली मुसली संस्कृत नाव- मुसला असे आहेत.
पांढऱ्या मुसळी मध्ये कार्बोहायड्रेडस , प्रोटीन, स्यापोजेनीन, स्यापोनीन, तसेच अनेक खनिज आढळतात.शारीरिक दुर्बलता तसेच ताकतीसाठी, पौष्टिक व बलवर्धक, स्तनदा मातांचे दुध वाढविण्यासाठी, प्रसवोत्तर होणारे स्त्रीरोगांवर उपयोगी, मधुमेह, वंधत्व कमी करण्यासाठी, शुक्रजंतू वाढीसाठी अशा अनेक आजारांमध्ये याचा मोठ्या प्रमाणात होतो.
[…]