कळत न कळत
आपल्या आजूबाजूला वावरतांना नीट लक्ष देऊन ऐकाल व लक्षात ठेवालं तर कुठल्या ना कुठल्यातरी संधर्भात काही शब्द आपण वारंवार उच्चारताना पाहतो. अर्थात हे शब्द मुद्दामून वापरले जात नाहीत तर सहज ओठावर दररोजच्या चांगल्या का वाईट सवयींमुळे का शिष्ठाचाराने येतात हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे एवढे खरे. पण काही शब्द काळ, वेळ, कारण व प्रसंगाचे भान न ठेवता वापरल्यास अर्थाचा अनर्थ होऊन आपण एका चांगल्या मित्राची/मैत्रिणीची एवढ्या वर्षाची मैत्री गमाविण्याची पाळी येऊ शकते.
[…]