नवीन लेखन...

वृत्तवाहिन्यांचे भान सुटले

अलीकडे टीआरपी वाढविण्याच्या हव्यासापोटी विविध वृत्तवाहिन्या आपले तारतम्य सोडून बातम्या दाखवत आहेत असे दिसते. आणि विशेषतः जेव्हा कधी मुंबईवर अतिरेकी हल्ले किंवा बॉम्बस्फोट होतात तेव्हा ही बाब प्रकर्षाने जाणवते. या नादात वृत्तवाहिन्या आपणच ‘गुप्तचर’ असल्याच्या अविर्भावात, (जेव्हा की तपासयंत्रणा अजून घटनास्थळावरून सॅम्पल गोळा करत होत्या, त्यानंतर त्यांची तपासणी होऊन त्याचे निष्कर्ष जाहीर होणार त्याआधीच) स्फोटके कोणती वापरली गेली, या बॉम्बस्फोटामागे कोणत्या संघटनेचा हात आहे हे फक्त आपल्यालाच ‘कळले’ अशा थाटात बातम्या दाखवताना दिसत होत्या.
[…]

परमपूज्य देवास पत्र

आम्हांला कर्मस्वातंत्र्या बरोबर मन व बुद्धी दिल्यामुळे आंम्ही खुपच प्रगती केली आहे. परंतू आज पृथ्वीवर मानव सुखी व सामाघानी का नाही? का तो एकमेकांचे पाय खेचत असतो? मर्यादांचे पालन करताना दिसत नाही! मोहात पदोपदी अडकत असतो व इतरांना अडकवतो. आम्हांला वाटते की त्याला तू मन व बुद्धीचे रसायन दिलेस व त्यात भर म्हणून की काय कर्म स्वातंत्र्य दिलेस. अमर्याद कर्म स्वातंत्र्याचा आपल्या स्वार्थ व भोगावादासाठी असा काही उपयोग करून घेत आहे की तो आज स्व:लाच विसरला आहे की तो प्रथम एक माणूस आहे. आम्हांला दिलेल्या कर्मस्वातंत्र्याचे आता अपचन होत आहे. जास्त खाल्ले की अपचन होऊन तब्बेत बिघडते व शरीरात जास्त वात होऊन त्याचा मन व बुद्धीवर परिणाम होतो. देवा खरंच सांगतो मानवाच्या मेंदूतील कर्म स्वातंत्र्य नावाचे व आपण देवाच्या वर नाही, श्रेष्ठ नाही याचे भान ठेवणारे स्मरणशक्तीचे PCB (Printed Circuit Brain (Board) बदलण्याची वेळ आली आहे. […]

बॉम्बस्फोट आणि राजकारण

१३ जुलै २०११ रोजी सायंकाळी मुंबईत ३ ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटाने, मुंबई सुरक्षित आहे हे राज्य सरकारने वेळोवेळी केलेले दावे फोल ठरवले आहेत. आणि मुंबईकर आजही असुरक्षित आहेत हे पुन्हा एकवार अधोरेखित झाले आहे.

बॉम्बस्फोट करण्यासाठी लागणारी स्फोटके आणि इतर साधनसामग्री मुंबईची सुरक्षाव्यवस्था भेदून अतिरेकी पार आतपर्यंत घेऊन येऊ शकतात ही एकच गोष्ट सुरक्षाव्यवस्थेचे धिंडवडे काढण्यास पुरेशी आहे. त्यामुळे सरकारच्या कोणत्याही दाव्यावर मुंबईकरांनी विसंबून रहाण्याचे कारण नाही.
[…]

आपण हे बदलू शकतो का?

आता आनंद, जल्लोष व उत्साहाने सण व उत्सवांना सुरुवात होईल. आपले सण व उत्सव मोठया आनंदाने आणि प्रेमाने साजरे केलेच पाहिजेत याबद्दल दुमत नाही. तरुणांत उत्साह आहे, पण त्याला शिस्तीची जोड कुठेतरी कमी पडते किंवा अतिउत्साहात तिचा विसर पडल्याचे सतत जाणवते. सण व उत्सवाचे पावित्र्य, महात्म्य, त्यामागील कार्यकारणभाव प्रकर्षाने व्यक्त होताना दिसतो परंतू त्याला स्पर्धात्मक, व्यापारी आणि राजकारणाची झालर असलयाचे जाणवते.
[…]

युसूफ मेहेर अली सेंटर – तारा

युसूफ मेहेर अली हे स्वातंत्र्यपूर्व भारतात इंग्रजाच्या जुलूमी रावटीविरोधात कामगारांना व शेतकर्‍यांना संघटित करुन त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणारे प्रखर व तेजस्वी सेनानी होते. त्यांच्या बाणेदार व तडफदार स्वभावाचा वारसा पुढे चालवत त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पनवेलमधील तारा या निसर्गरम्य गावी युसूफ मेहेर अली सेंटर सुरु करण्यात आले व काही वर्षांमध्येच या सेंटरने स्वच्छ प्रतिमा व समाजवादी तत्वांच्या बळावर स्वतःचा आदरयुक्त दबदबा निर्माण केला. […]

एक गंमत उंदराची

काल रात्री झोपेमध्ये व्यत्यय माझ्या आला मज उठ्वूनी गेला कुठुनसा एक उंदीर घरामध्ये शिरला मज छ्ळून गेला खुड्बुड खुडबुड करूनी त्याने उच्छाद मांडला मज चिड्वुनी गेला कपातात शिरूनी त्याने कुरतडला भरजरी शेला मज रड्वुनी गेला शेवटी त्याला मारण्याचा निश्चय माझा झाला औषध खाऊनी उंदीर अखेर निघुनिया गेला मज हसवूनी गेला — प्रभा मुळ्ये

1 20 21 22 23 24 72
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..