2011
गोडीचं मोजमाप
साखर म्हणजे गोड एवढंच आपल्याला माहिती असतं. पण ही गोडी मोजण्याचाही मानदंड आहे. कोणत्याही गोड पदार्थाची गोडी सहसा मोजली जाते ती सुक्रोजच्या गोडीच्या प्रमाणातच. सुक्रोजची गोडी एक असं मानलं जातं.
[…]
दुधात साखर !
ज्यांना मधुमेहाच्या व्याधिनं ग्रासलेलं आहे अशा मंडळींच्या रक्तातल्या ग्लुकोजच्या प्रमाणाचं व्यवस्थित नियंत्रण होऊ शकत नाही. रक्तात ग्लुकोज साठत जातो. त्यामुळं त्यांच्या शरीरस्वास्थ्याला बाधा येते. त्यांच्या खाण्याला गोडाची चव तर द्यायची पण त्यांना ग्लुकोजच्या अतिरिक्त सेवनापासून वाचवायचं म्हणून मग काही कृत्रिम साखरी तयार केल्या गेल्या आहेत.
[…]
पडत्या फळाची आज्ञा
वैज्ञानिक दृष्टिकोन या शब्दप्रयोगातल्या वैज्ञानिक या शब्दामुळं थोडीशी दिशाभूल होते. वैज्ञानिक आपल्या संशोधनकार्यासाठी जी प्रणाली वापरतात ती या शब्दप्रयोगाचा वापर करण्यात अभिप्रेत आहे. वैज्ञानिक आपलं काम कसं करतात? तर ते कोणतंही विधान तसं सहजासहजी किंवा कोणाच्याही दबावाखाली मान्य करत नाहीत. […]
चिकित्सा करा
आजकाल सतत एक उपदेश ऐकवला जातो. वैज्ञानिक दृष्ठिकोन बाळगा. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याची आत्यंतिक गरज आहे. समाजधुरीण, रातकीय नेते, शिक्षणमहर्षी, एवढंच कशाला पण गल्लीतल्या सत्यनारायणाच्या पूजेला पाहुणा म्हणून बोलावलेला एखादा अभिनेता किंवा असाच पेज थ्रीवरचा सेलिब्रिटीही आपल्याला ते सुनावून जातो. […]
फांद्या कुठवर छाटणार?
आपल्याला लोकपाल, लोकायुक्त का हवे आहेत, कारण राजकारणी भ्रष्ट आहेत आणि राजकारणी का भ्रष्ट आहेत, कारण लोकांचा त्यांच्यावर अंकुश नाही. हा अंकुश मतपेटीच्या माध्यमातून ठेवता येत असेल तर आधी त्याचाच विचार व्हायला हवा.
[…]
ये निद्रे मज बिलगून घे
ये निद्रे मज बिलगून घे
[…]