नवीन लेखन...

संसारातील समस्यांचे उत्तर आत्महत्या नव्हे !

महागाई, स्पर्धा, दगदग, धावपळ, अनिश्चित दैनंदिन जीवनामुळे सर्वच जनता हवालदिल झाली आहे. त्यात महिलांचे प्रश्न दिवसेंदिवस वाढत चालले आहे. काही महिलांचे लैंगिक शोषण होताना दिसते, काही महिला जाचाला बळी पडताना दिसतात तर काही कंटाळून व वैतागून हतबुद्ध होऊन आत्महत्या करीत आहेत. पण याने प्रश्न सुटणार तर नाहीच पण गुंता मात्र नक्की वाढणार. महिलांच्यात नैसर्गीरीत्याच श्रद्धा सबुरी असते पण कधी कधी मन बुद्धीच्या ताब्यात न राहिल्याने काही वेगळे प्रसंग बघायला मिळतात.
[…]

शेतकरी नवरा-नको रे बाबा !

आपला भारत कृषिप्रधान देश म्हणून सर्वत्र ओळखला जातो. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या आत्महत्येच्या प्रश्न अनुत्तरीतच आहे व त्यावर अजून तरी काही ठोस पाऊले उचल्याची बातमी नाही. नुसते अनुदान देऊन प्रश्न सुटेल असे वाटत नाही.
[…]

सध्याचे मिरवणुकांचे चित्र कधी बदलणार

नुकतीच भगवान महावीर जयंती झाली, त्यानिमित्ताने ठिकठीकाणी शोभायात्रा निघाल्या. प्रतिवर्षाप्रमाणे आमच्याही गावात ही शोभायात्रा संपन्न झाली. भगवान महावीर जयंती निमित्ताने जैन समाजातर्फे दरवर्षी निघणारी ही मिरवणूक लहानपणापासूनच माझ्या आकर्षणाचा विषय ठरत आलेली आहे.
[…]

जुने ते सोनेच होते!

’झिरो बजेट’ शेती किंवा नैसर्गिक शेती हाच शेतकर्‍यांच्या समस्यांवरचा एकमात्र तोडगा आहे. जुने तेच सोने होते, हे आता सिद्ध झाले आहे. सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ही केवळ गोष्टींच्या पुस्तकात आहे, हे शेतकर्‍यांनी लक्षात घ्यायला हवे. निसर्गाला आव्हान देऊन आपण उभे राहू शकत नाही. एवढ्या शक्तीशाली जपानचे अवघ्या दोन दिवसात मातेरे झाले. आधुनिक तंत्रज्ञान जोपर्यंत निसर्गाशी इमानदार आहे तोपर्यंत ते ठीक आहे, त्याच्या पुढची पायरी गाठण्याचा प्रयत्न हे तंत्रज्ञान करीत असेल तर शेवटी सगळ्याची माती होणार हे निश्चित!
[…]

“वन औषधी अग्निशिखा”

आपल्या बागेतील फुल पाहताच कोणाचेही लक्ष वेधून घेणारी वनस्पती म्हणजे ‘अग्निशिखा’ होय.अग्निशिखा ही वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.जंगलात शोध घेतला तर ही वनस्पती खूपच विरळ प्रमाणात आढळून येत आहे. जंगलांना वारंवार लागणाऱ्या आगींमुळे ह्या वनस्पतीचे जमिनीतील कंद नष्ट होतात.पर्यायाने ही प्रजाती दुर्लभ झाली आहे.नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या ह्या वनस्पतीला आपल्या परसबागेत स्थान देण्याची आज निकड निर्माण झाली आहे.
[…]

1 39 40 41 42 43 72
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..