आपल्या देशाने महासत्ता व्हाव ही प्रत्येक भारतीयाच्या मनातील इच्छा आहे. २०२० पर्यंत इंडिया महासत्ता होईलच. पण भारत महासत्ता होईल का? एकीकडे झपाट्याने बदलणारा इंडियाचा कार्पोरेट चेहरा तर दुसरीकडे ‘जैसे थे’ स्थितीतील ग्रामीण भारत; याला महासत्ता म्हणता येईल का? अनेक खेडी ही समस्यांच्या अंधारात चाचपडत आहेत. अस्वछ्चता, स्थानिक राजकारण, नेतृत्वाचा अभाव, शैक्षणिक सुविधांचा अभाव, स्पर्धा परीक्षांबाबतची उदासीनता, सरकारी कर्मचाऱ्यांची मनमानी, अनिष्ठ चालीतीती या असंख्य अडचणींचा विळखा सुधारणा होऊ देत नाही. खेड्यातील तरुण व सुशिक्षित नागरिक एकत्र आले तर ही स्थिती बदलू शकेन.
[…]