नवीन लेखन...

घरातच फुलवा बाग

घराभोवती बाग फुलवण्याची कितीही इच्छा असली तरी आजच्या फ्लॅट संस्कृतीमुळे बागेसाठी जागा पुरत नाही. अशा वेळी निसर्गप्रेमींना घरातच बाग फुलवावी असे वाटते. इनडोअर प्लॅन्ट्समुळे ते सहज शक्य होते. या रोपांमुळे घर सुशोभित होतेच, पण हवेतील ऑक्सिजनच्या प्रमाणात वाढही होते. थोडी काळजी घेतली आणि वेळेवर खत-पाणी दिले तर घरातील बागही आपल्याला बाहेरच्या बागेसारखाच आनंद देते. […]

चढतेय विश्वचषकाची झिंग

आयसीसी विश्वचषक स्पर्धा केवळ दीड महिन्यांवर येऊन ठेपली असताना भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड या प्रमुख दावेदारांबरोबरच इतर देशही तयारीला लागले आहेत. भारताची सध्याची कामगिरी पाहता या विश्वचषकावर धोनीच्या शिलेदारांनी नाव कोरल्यास कोणालाच आश्चर्य वाटणार नाही. प्रश्न आहे तो अंतिम अकरा जणांच्या योग्य निवडीचा.
[…]

बोफोर्सच्या भुताची पंचविशी

एखाद्याच्या मागे ठरावीक समस्येचा ससेमिरा कायम राहतो तशी काँग्रेसची अवस्था झाली आहे. बोफोर्स प्रकरण बाहेर आल्यावर गदारोळ उडाला आणि त्या लाटेत काँग्रेसला पराभूत व्हावे लागले. त्यामुळे सत्तेवर आल्यावर येनकेनप्रकारेन हे भूत गाडून टाकायचे असा काँग्रेसचा निर्धार होता. त्या दृष्टीने केलेले प्रयत्न बर्‍यापैकी यशस्वी झाले. पण, आता इतक्या वर्षांनंतर हे भूत पुन्हा जागे होऊन काँग्रेसच्या मानेवर बसले आहे.
[…]

पीक विमा योजनेची नवी संकल्पना

गेल्या वर्षी लांबलेल्या पावसाने आणि आता अचानक वाढलेल्या थंडीमुळे कृषीक्षेत्र अडचणीत आले. खरे तर अलीकडे तापमानातील बदल आणि निसर्गाचा लहरीपणा यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. अशा वेळी त्याला शासनाकडून नुकसानभरपाई दिली जात असलेली तुटपुंजी आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय विमा कोष ही नवी संकल्पना अस्तित्वात यायला हवी.
[…]

ज्योतिषातील अनिष्ट प्रथा आणि अंधश्रद्धा

पुण्यामध्ये एक ‘आगळे वेगळे’ ज्योतिषी आहेत. त्यांचे भविष्य कथन अचूक आणि सकारात्मक असते. पण त्यांच्या मते ज्योतिषामध्ये कांही अनीष्ट प्रथा आहेत. ‘कर्मकांड’ या नावाने या प्रथा आजही अस्तित्वात आहेत. शापित पत्रिका, कालसर्प योग, नारायण नागबळी, मंगळ दोष, ग्रह दोष, नक्षत्र दोष, साडेसाती, वास्तू दोष ही ती ‘कर्मकांडे’ आहेत. त्यांच्या मते प्रत्यक्षात अशी कोणतीही कर्मकांडे अस्तित्वात नाहीत. […]

आर्थिक आरोग्य – सुखी जीवनाची गुरुकिल्ली

हल्ली लोकांची आरोग्यविषयक जागृती वाढू लागली आहे हे एक चांगले लक्षण आहे.पण यामध्ये फक्त शारीरिक आरोग्याचाच विचार केला जातो. माणसाच्या दृष्टीने तीन प्रकारची आरोग्ये महत्वाची आहेत. ती खालीलप्रमाणे आहेत. १) शारीरिक आरोग्य ( Physical Health ) २) मानसिक किंवा भावनिक आरोग्य ( Mental or Emotional Health ) ३) आर्थिक आरोग्य ( Financial Health ) ज्या व्यक्तींची […]

बोन डेन्सिटोमेट्री (हाडांची घनता)

वयाच्या ३५ नंतर हाडांमधील कॅल्शिअमचे प्रमाण पुरुष-स्त्रियांमध्ये हळूहळू कमी होते; परंतु काही स्त्रियांमध्ये एकदम जोरात घसरु लागते व अशा स्त्रियांना कंरदुखी, पाठदुखी व थोड्याशा दुखापतीमध्ये फ्रॅक्चर होणे असे आजार भेडसावू लागतात. म्हणून साधारण ४० नंतर प्रत्येक व कंबरदुखी असलेल्या सर्व पुरुषांनी बी.डी.एम. हा पास करुन, आपल्या हाडांची घनता कशी आहे, हे अधूनमधून बघितले पाहिजे.
[…]

1 66 67 68 69 70 72
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..