नवीन लेखन...

डॉ.अनिरुद्ध धैर्यधर जोशी, एक बहुआयामी व्यक्तिमत्व

रत्नाच्या आकाराचा विचार करून त्यासाठी कोंदण बनविले जाते परंतू येथे डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी नावाच्या हिऱ्याला कोंदणात बसवितांना कोंदणांचा आकार बदलावा लागत नाही तर स्वत: हिराच कोंदणाच्या आकाराचा होतो. डॉ. अनिरुद्ध जोशी ह्यांचे बालपण म्हणजे जोश्या, डॉ.अनिरुद्ध धैर्यधर जोशी ते परमपूज्य सदगुरु श्री. अनिरुद्ध बापू हा प्रवास विविध कंगोर्यांनी आणि पैलूंनी भरलेला असल्याचे सर्व लेख वाचतांना लक्षात येते. बहुआयामी हा शब्दसुद्धा जेथे फिका पडतो, आणि सर्व विशेषणे कमी पडतात. पावित्र्य हेच प्रमाण आणि मर्यादेची चौकट अंगी बाणलेल्या डॉ. अनिरुद्ध जोशींचे विविध पैलूंनी भरलेले व्यक्तिमत्व हीच एक मोठी व्याख्या आहे, चौकट आहे, मर्यादा आहे, सत्य, प्रेम व आनंदाने खचाखच भरलेला देवयान पंथ आहे. जीवनाच्या सर्व व्याख्या, पायऱ्या, ध्येय, उद्दिष्ट, आणि मर्यादा येथूनच सुरु होतात असे गर्वाने म्हणावेसे वाटते. || ॐ मन:सामर्थ्यदाता श्री.अनिरुद्धाय नम: ||
[…]

धोनी आणि कंपनीचा “धोबीघाट” !!!!!

बरे झाले एकाअर्थी. त्यांना कोणीतरी जमीनीवर आणायलाच हवे होते. भारताच्या कागदी वाघांचा पतंग उगाचच भरार्‍या घेत होता आणि लोकांनाही मूर्ख बनवत होता. आम्ही जगातले सर्वोत्कृष्ट “क्रिकेटवीर” आहोत याचा आम्हाला माज होता. तो नेमका मकरसंक्रांतीच्या दिवशीच कांगारुंनी उतरवला.
[…]

विज्ञानीय दृष्टीकोनातून भगवत् गीता

भगवतगीता या, सुमारे ५ हजार वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या महान ग्रंथावर अनेक विद्वानांनी भाष्य केले आहे. गीतेच्या १८ अध्यायात वेदोपनिशदांचे तत्वज्ञान सामावलेले आहे. सांख्ययोग म्हणजे गीतेचे सार, गीतेचा अर्क समजला जातो. […]

घरोघर शिवाजी निर्माण करा!

आमच्या माता शिक्षित असायला हव्यात आणि माता-पित्यानंतर ज्यांना स्थान दिले जाते ते गुरूजन तितक्याच तोलामोलाचे असायला हवेत. मुलाच्या वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत त्याला अत्युच्च दर्जाचे शिक्षण, शैक्षणिक सुविधा, त्याच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक वाढीसाठी आवश्यक असलेली सगळी संसाधने सरकारने उपलब्ध करून द्यावीत. उद्याचा भारत बलवान करायचा असेल, नोबल पारितोषिक विजेते भारतातही घडवायचे असतील, तर आजच्या प्राथमिक शाळा, अंगणवाड्या सगळ्याच दृष्टीने मजबूत करणे भाग आहे.
[…]

गुंतवणुकदारांना सावधगिरीचा ईशारा

झटपट श्रीमंत होण्याचा मोह अनेकांना असतो. कमीत कमी वेळात भरपुर पैसा मीळवावा. केलेल्या गुंतवणुकीवर झटपट चांगला लाभ किंवा परतावा/ प्रॉफीट मिळावा असा लोभ अनेकांना असतो. या लोभापायीच अशा गोष्टी घडत असतात. या प्रकारच्या योजनांचा अभ्यास केल्यावर त्यांचा एक विषिष्ट पॅटर्न माझ्या लक्षात आला आहे. […]

कटीपतंग, चॉईस इज युअर्स !

पतंग उडविण्याचा इतिहास ३००० वर्षाहून जास्त आहे. चीनमध्ये बांबू आणि सिल्कच्या कपड्या पासून पतंग बनवीत असतं. चीनमध्ये पतंग उडवीण्याला धार्मिक व पौराणिक महत्व होते. पतंगाच्या मांजाला वैज्ञानिक उपकरणे बांधून हवामानाचे अनेक अंदाज घेतले जात असतं. अमेरिकन शास्त्रज्ञ बेंजामिन फ्रँन्क्लीन याने पतंगाच्या साह्याने वातावरणातील (पावसाळी ढगातील) विद्युत शक्तीचा शोध लावण्यासाठी उपयोग केला. लॉरेन्स हर्ग्वे यांनी पतंगाचा उपयोग वाहतुकीसाठी केला असे म्हंटले जाते. ७ नोव्हेंबर १९०३ साली स्यॅमुअल फ्रँन्क्लीन कोडी यांनी इग्लिश खाडी पार करतांना होडीला खेचण्यासाठी पतंगांचा उपयोग केला होता. पूर्वीच्या काळी पतंगांचा मांजाला काही उपकरणे बांधून खूप उंचावरून शत्रूवर नजर ठेवण्यासाठीही मिलिटरीत त्याचा उपयोग केला जात असे. दुसऱ्या महायुद्धात (१९३९-४५) मध्ये पतंगांचा गनरी टार्गेट म्हणून उपयोग केला गेला होता. प्रत्येक देशामध्ये त्याचे महत्व वेगवेगळे आहे.
[…]

रान

विरहाचया वणव्यात पेटलेल्या मनाच एक गाण.
[…]

बाळकृष्ण

रंगले माझे मन मुरारी नाम येई मुखीं श्रीहरी //धृ// काळा सावळा रंग कोमल भासे अंग हास्य खेळते वदनीं तेज चमके नयनीं ओढ लागतां शरिरीं //१// रंगले माझे मन मुरारी, नाम येई मुखीं श्रीहरी कंठी माळा चमकती मोर पिसे टोपावरती पायीं नुपुरे घालूनी नाचतो ताल धरुनी हातांत त्याच्या बासरी //२// रंगले माझे मन मुरारी, नाम येई मुखीं […]

1 2 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..