मराठी शाळांच्या प्रगतीसाठी नव्या प्रयोगाची आवश्यकता..!
२१ व्या शतकात जागतिक महाशक्ती बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतात, शिक्षणाच्या क्षेत्रात नवीन प्रयोगाची गरज नाही काय ? वाढत्या लोकसंख्येबरोबर शासनासामोरील समस्यांचे डोंगर वाढत आहे. गाव तिथे शाळा, हे धोरण असल्याने बऱ्याच शाळांत विध्यार्थी संख्या नाममात्र दिसते. १० ते ५० पटसंख्या असलेल्या शाळांचे प्रमाण भरपूर आहे. शासनाच्या नवीन धोरणानुसार ६० पटसंख्ये पर्यंत दोन शिक्षक, हे धोरण असले तरी इयत्ता ४ आणि शिक्षक २ ह्याचा कोठेही मेळ बसत नाही.
[…]