ढोल्या गणपती – नाशिक
पुरातन काळापासून नाशिक शहर व त्या आसपासचा परिसर विविध नावांनी ओळखला जात असे. जनस्थान, त्रिकंटक, गुलशनाबाद, आणि विद्यमान नाशिक अशी चार नावे या परिसरास होती असे उल्लेख आढळतात. ऐतिहासिक काळापासून नाशिक धार्मिक स्थळ मानले गेले आहे. रामायणात नाशिक परिसरातील “पंचवटी” येथे श्रीराम वास्तव्यास होते, असा उल्लेख आहे.
[…]