सुवर्ण आवरणात झाकलेल सत्य
सूर्योदयाच्या वेळी सोनेरी रंगाचा सूर्य आपण नेहमीच पाहतो. आज सकाळी बगीच्यात फिरायला गेलो होतो. सूर्योदयाची वेळ होती, बागीच्यातल्या खुर्चीवर बसून पूर्व दिशेला सोनेरी रंगात रंगलेल्या सूर्य नारायणाला पहात होतो, दहा-पंधरा वर्षांपूर्वी वाचनात आलेला ईशोपनिषदातला हा मंत्र आठवला. मनात विचार आला, सूर्याला आपण क्षणभर ही पाहू शकत नाही. हा मंत्रदृष्टा ऋषी तर चक्क सोनेरी आवरण दूर करण्याची विनिती देवाला करीत आहे. सत्यरूपी तळपळणारा सूर्य पाहण्यासाठी. सत्यमार्गावर चालणारा हा मंत्रदृष्टा ऋषी सूर्याचे तेज सहन करू शकत होता……
[…]