औचित्य जागतिक दृष्टीदान दिनाचे !
मानवाच्या शरीराची पंच इंद्रिये त्यांना नेमून दिलेले कार्य करणारी असतील तर त्यांचा उपयोग आहे. शरीरावर नुसती पंचेंद्रिये असून काय फायदा? ती सशक्त, सुद्रुढ व कार्यरत नसतील तर काय कामाची? तसेच अगदी सुंदर रेखीव मासोळीदार काळेभोर टपोरे डोळे आहेत पण ते बघू शकत नाहीत तर त्यांचा काय उपयोग? दैनंदिन जीवनात पदोपदी डोळ्यांची आवश्यकता भासते.
[…]