नवीन लेखन...

नागरिक पत्रकार (Citizen Journalist) बना !!!

मराठीसृष्टीच्या नागरिक पत्रकार योजनेनेद्वारे आपल्या अवतीभवती घडणार्‍या घटना टिपून त्या आपण आता थेट अपलोड करु शकाल मराठीसृष्टीच्या नागरिक पत्रकार विभागात […]

चाकोरीबाहेर जाऊन हळद उत्पादनाचा यशस्वी प्रयोग

नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा या तालुक्यांचा परिसर कसमादे पट्टा म्हणून ओळखला जातो. या भागातील शेतकरी नेहमीच नवनवीन प्रयोग करुन शेती उत्पादनात वाढ करण्याचा प्रयत्न करतात. असाच एक प्रयोग देवळा येथील पेशाने शिक्षक असलेल्या संजय देवरे या शेतकऱ्याने केला आहे. हळदीचे पीक घेऊन त्याचे जास्त उत्पादन काढण्याचा यशस्वी प्रयोग त्यांनी करुन दाखविला आहे.
[…]

आकाशवाणीतला सामाजिक सूर

प्रसार माध्यमांचा गजबजाट असलेल्या आजच्या जगात सगळ्या बाजूंनी माहिती आणि मनोरंजनाचा भडिमार आपल्यावर होत असतो. त्यातही टीव्हीसारखं दृश्य माध्यम आणि इंटरनेटवरल्या सोशल नेटवर्किंग साईट्ससारखं परस्परसंवादी माध्यम यांना लोकांची पसंती असते. आजच्या जगात या सगळ्यांचं महत्त्व आहेच, ते नाकारताही येणार नाही. या पसाऱ्यात आकाशवाणी किंवा रेडिओचा विसर आपल्याला पडतोय का? कदाचित पडतोय. तशी हल्ली एफ. एम. वाहिन्यांची लोकप्रियता अगदी तरुण वर्गातही थोडी रुजू पाहते आहे. तरीही आकाशवाणीला जे पूर्वी लोकांच्या मनात खास स्थान होतं, ते आज उरलेलं नाही. अर्थातच आकाशवाणी यापुढेही असणार आहे आणि आपलं काम ती करत राहणार आहे. एके काळी आकाशवाणीचा दबदबा केवढा होता, तिथे मोठमोठे कलाकार, लेखक, गायक, संगीतकार, नट इ. कसे वावरले हे आपण अनेकदा तिथे काम करणाऱ्या मंडळींच्या आठवणीतून ऐकलं-वाचलं आहे. आकाशवाणीत काम केलेल्या बऱ्याच मंडळींची या विषयावरली पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत.
[…]

महापियेन – श्री गणेश – ब्रम्हदेश

ब्रम्हदेशातील नदी किनारी वसलेल्या प्रदेशातील मोनलोक म्हणून ओळखला जाणारा हा गणेश “व्यापारी विघ्नहर्ता” म्हणून प्रसिद्ध आहे. ही मूर्ती ६व्या शतकातील असावी. श्याम वंशाच्या कोणा आयुथीयान कारागिराने ही बनविलेली असावी. ह्या गणेशाला महापियेन अशी संज्ञा आहे.
[…]

सूर्य विनायक – नेपाळ

भारतीय गणेश उत्पत्ती विषयी असलेली कल्पना डावलून नेपाळ संस्कृतीने आपले गणेश दर्शन घडविले आहे. गणेश हा शिवपुत्र न मानता तो स्वयंभू असून एका सूर्य किरणात त्याचे दर्शन आले आहे असे मानून सूर्य-विनायक हे अधिष्ठान दिले आहे. जगातील इतर राष्ट्रात सुर्यपुत्र हा मान्य असलेला संकेतही नेपाळ संस्कृतीला मान्य असलेला दिसत नाही. ह्या सूर्य विनायकाचे मंदिर काठमांडू पासून आठ मैलावर भाटगांव येथे आहे. ते भव्य आहे. नेपाळच्या चित्रांकित नृत्यगणपतीच्या सभोवती चार गणपती असतात. त्यातील भव्य व मुख्य देवता सूर्य विनायक होय.
[…]

महाराजलीला मुद्रा श्री गणेश – कंबोडिया

ही गणेशमूर्ती १३ व्या शतकातील असून ती ब्राँझची बनविलेली आहे. मूर्तीवर विविध अलंकार असून ते हिरव्या रंगात दाखविलेले आहेत. या गणेश मूर्तीला दोन हात असून अर्धवट वाकलेल्या स्थितीत बसलेली आहे. उजव्या हातात मोडलेला सुळा व डाव्या हातात ग्रंथ आहे. यातच मांगल्य व ज्ञानाचे दर्शन होते.
[…]

मस्तकावर शिवलिंग व घंटाधारी रोम येथील द्विभूज गणेश (गुरु) मूर्ती

रोम येथील बार्जीयन मुझियम वेलोस्ट्रेज येथील मस्तकावर शिवलिंग व घंटाधारी द्विभूज गणेश (गुरु) मूर्ती रोम आणि भारतीय संस्कृती ह्यांच्या एकत्रीकरणाचा उत्कृष्ट नमुना आहे. शिव पुत्र, सुर्यपुत्र आणि विघ्नहर्ता म्हणून जगात प्रसिद्ध असलेला श्री गणेश येथे विद्यादायक गुरुस्वामी म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. येथे श्री गणेश गुरु म्हणून ओळखला जातो.
[…]

जुने जाऊ द्या मरणालागुनी !

साचलेल्या पाण्याचे नेहमीच डबके होते, कालांतराने त्यात शेवाळ साचते, घाण आणि चिखल यापलीकडे तिथे काही उरत नाही; परंतु प्रवाहित असलेले पाणी नेहमीच ताजे, स्वच्छ, पारदर्शक असते. आपल्या समाजाचेही असेच डबके होऊ पाहत आहे. विचारांचा प्रवाह कुंठीत झाला आहे, जुन्या रूढी-परंपरा, त्यांची जळमटे या समाजाचे चित्र अधिकच भेसूर करीत आहेत.
[…]

1 44 45 46 47 48 52
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..