माझी तत्वसरणी :: धर्माचरणांचा कार्यकारणभाव.
माझी तत्वसरणी कदाचित कुणालाही सहजासहजी पटणार नाही, याची मला पूर्ण जाणीव आहे. तरीपण, ती सर्वाना सांगण्याचा मोह टाळता येत नाही. विचारांची दिशा म्हणजे विचारसरणी….तसेच तत्वांची दिशा म्हणजे तत्वसरणी असा अर्थ समोर ठेऊन मी हे लेख लिहिले आहेत.
दैनंदिन जीवनात आपण, दिवसाचा काही भाग, विशेषतः आंघोळीनंतर, देवपूजा, पोथ्या वाचन, जपजाप्य, मंत्रपठण, ध्यानधारणा, एखादे स्तोत्र म्हणणे वगैरेत घालवितो. ही सर्व धार्मिक आन्हिके, पुरातन काळापासून आचरली जात आहेत. ही आन्हिके केव्हातरी, कुणीतरी, काही विशिष्ट उद्देश ठरवून प्रचारात आणली असावीत. दिवसाचाकाही काळ, इतर विचार बाजूस सारून, चांगले सात्विक विचार मेंदूत यावेत हाच असावा असे वाटते. विज्ञानीय दृष्टीकोनातून या सर्वांचे मनन केल्यास, बर्याच बाबींचा उलगडा होतो.
[…]