“२०१३ या वर्षाची सुरुवात झाली मराठी चित्रपटांसाठी एका सुखावणार्या बातमीने. ‘बी.पी.’ हा बहुचर्चित सिनेमा रिलीज झाला अन् बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई झाली. अर्थात कोटीची उड्डाणे या वर्षी अनेक चित्रपटांनी घेतली. विषयांमध्ये विविधता, प्रगल्भता आणि मुख्य म्हणजे प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादासोबत सतत ‘आपला सिनेमा’ प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय देखील ठरला. आणि त्याहून सुवर्णक्षण म्हणजे विविध विभागांमध्ये राष्ट्रीय स्तरातील पुरस्कारांवर उमटवलेली ‘मोहोर’. ही २०१३ या वर्षीची ठळक वैशिष्टये म्हणता येतील.”
मराठी चित्रपटाच्या अनुषंगाने २०१३ हे वर्ष खासच होतं असं म्हणावं लागेल! कारण ‘आपला सिनेमा’ चर्चेत राहिला हेच खरं. कधी बी.पी (बालक-पालक) मध्ये हाताळलेल्या बोल्ड विषयातून तर ‘दुनियादारी’ , ‘मंगलाष्टक..वन्स मोअर’, नी केलेल्या रेकॉर्डब्रेक कमाईमुळे. अर्थात या वर्षी देखील काही चांगले विषय असलेले चित्रपट चालले नाही ही थोडीशी निराश करणारी बाब आहे. ‘७२ मैल-एक प्रवास’, ‘सत-ना-गत’, ‘अनुमती’, ‘संहिता’, ‘इन्व्हेस्टमेंट’, ‘तुह्या धर्म कोनचा’, ‘कुमारी गंगुबाई नॉनमॅट्रीक’, ‘पितृऋण’ ही त्यातलीच काही नावे. नाविन्याचा अभाव असलेले चित्रपट आले; पण सपशेल आपटलेच. ‘असा मी अशी तू’, ‘धतिंग-धिंगाणा’, ‘तेंडुलकर आऊट’, ‘गोविंदा’ वगैरे यामध्ये नवीन काहीच नव्हतं पण मूळ विषयांपासून हे चित्रपट भरकटताना दिसून आले. एक बाब प्रकर्षाने जाणवली की ‘कॉमेडी’ मध्ये तोच तोच पणा किंवा साचेबध्द विषयांभोवती रेंगाळणारी हसवणूक कुठेतरी व काही प्रमाणात कमी झाली आहे. उलट प्रेक्षकांना विचार करायला लावतील असे विषय विनोदी ढंगाने मांडले जात आहेत. याची प्रचिती ‘नारबाची वाडी’, ‘पोपट’, ‘खो-खो’, ‘टुरिंग टॉकीज’ मधून दिसली. आशय आणि व्यावसायिक स्तरावर देखील या चित्रपटांनी बर्यापैकी यश कमावलं. दुसरीकडे प्रेमाची केमिस्ट्री आणि बदलते नाते संबंध या विषयावर ‘प्रेमाची गोष्ट’, ‘टाइम प्लीज’, ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं…’, ‘वंशवेल’, ‘मंगलाष्टक…वन्स मोअर’ मधून सकस रितीने वेध घेण्यात आला.
‘दुनियादारी’ ने प्रेक्षकांना नॉस्टॅलजिक केलं आणि विषयाच्या केलेल्या आकर्षक बांधणीमुळे तसंच तगडी स्टारकास्ट यामुळे चित्रपटाने आजवरचे सर्व विक्रम तोडले. अर्थात मार्केटींग हा महत्वपूर्ण घटक असल्यामुळे अशा प्रकारचे चित्रपट हिट ठरणार यामध्ये काहीच दुमत नव्हतं. आजच्या तरुण पिढीने देखील ह्या चित्रपटाचा विषय आणि गाणी अक्षरश: डोक्यावर उचलून धरली हे सुध्दा नमूद करण्यासारखंच आहे.
‘अभिनय सावंत’, ‘आर्य देव’, ‘श्रीया पिळगावकर’ या स्टार पुत्र आणि कन्यांनी मराठी चित्रपटांमध्ये अगदी ‘दमदार पाऊल ठेवलं’. ‘सागरिका घाडगे’, ‘इशा कोपीकर’ या हिंदीतील तारका मराठीत दाखल झाल्या. ‘पितृऋण’ च्या निमित्ताने तनुजा अनेक वर्षांनी मराठी चित्रपटात पुन्हा अभिनय करताना दिसल्या.
आणखीन काही नोंद घेण्यासारख्या घटना म्हणजे ‘झपाटलेला’ चा वीस वर्षानंतर 3D स्वरुपात सिक्वेल आला. हिंदीतल्या ‘विरुध्द’ चा ‘कोकणस्थ’ च्या रुपाने रिमेक झालेला दिसला तर साहित्यावर उत्तम कलाकृती पहायला मिळाल्या.
भारतीय चित्रसृष्टी एकीकडे शतक महोत्सव साजरा करत असताना दुसरीकडे मराठी सिनेमाने राष्ट्रीय पुरस्कारांवर महत्वाच्या विभागात ठशठशीत मोहोर उमटवली. ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’, ‘अभिनेता’, ‘अभिनेत्री’, ‘गायिका’, ‘संगीत दिग्दर्शन’ आणि काही शॉर्ट फिल्म्स मध्ये देखील मराठीचा दबदबा दिसून आला.
एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते ती म्हणजे मराठी चित्रपट काही पाऊले पुढे जाऊन प्रेक्षकांसमोर येत आहे आणि या कौतुकासाठी पात्र आहेत तरुण निर्माते; दिग्दर्शक व खोर्यांने दाखल होणारं नवीन टॅलें
ट. एक गोष्ट बरी आहे आपल्याकडे ती म्हणजे प्रयोगासाठी पुरेपूर संधी आणि कल्पकतेने हाताळले जाणारे विषय. म्हणूनच कथा, पटकथा, संगीत, तंत्रज्ञान, गाण्यांमध्ये मोलाचे बदल घडताहेत पण याचा अर्थ असाही नाही की ‘फ्लॉप’ चित्रपटांचा ट्रेंड संपलाय. पण कमी एवढं मात्र नक्की, अजुनही मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारायची आहे. तसे प्रयत्न देखील होताहेत पण काही बाबतीत आपण कमी पडतोय हे नाकारून चालणार नाही. असो पण येणार्या २०१४ या वर्षात ही उणीव तरूण कलावंत भरून काढतील असा विश्वास मागोवा घेताना वाटतोय !
ट. एक गोष्ट बरी आहे आपल्याकडे ती म्हणजे प्रयोगासाठी पुरेपूर संधी आणि कल्पकतेने हाताळले जाणारे विषय. म्हणूनच कथा, पटकथा, संगीत, तंत्रज्ञान, गाण्यांमध्ये मोलाचे बदल घडताहेत पण याचा अर्थ असाही नाही की ‘फ्लॉप’ चित्रपटांचा ट्रेंड संपलाय. पण कमी एवढं मात्र नक्की, अजुनही मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारायची आहे. तसे प्रयत्न देखील होताहेत पण काही बाबतीत आपण कमी पडतोय हे नाकारून चालणार नाही. असो पण येणार्या २०१४ या वर्षात ही उणीव तरूण कलावंत भरून काढतील असा विश्वास मागोवा घेताना वाटतोय !
— सागर मालाडकर
Leave a Reply