ज्या भाषेचा वापर ज्ञानार्जनासाठी, ज्ञानसंवर्धनासाठी व ज्ञान आणि माहितीच्या आदान-प्रदानासाठी होत नाही अशा भाषेची झीज मोठ्या वेगाने होते, आणि भाषेचे भवितव्य फारतर बोली भाषा म्हणून रहाण्याचा धोका असतो. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची चर्चा सध्या सुरु आहे. मात्र मराठी बाण्याला जागून या प्रयत्नांवर मराठीसाठी “अडगळ” ठरलेले मराठी “स्टॉलवर्ट” साहित्यिक “नेम“ धरुन उभे आहेत.
मराठीच्या विकासासाठी प्रशासन, प्रसारमाध्यमे, उद्योगधंदे, विज्ञान-तंत्रज्ञान, विविध व्यवसाय या सर्वच क्षेत्रात तिचा वापर वाढायला हवा. प्रसंगी त्यासाठी युक्ती, शक्ती, सक्ती आणि संधी या सर्व मार्गांचा वापर करायला हवा. खळ्ळ खट्याक कडे प्रत्येक वेळी राजकारणाच्या चष्म्यातूनच पहायला हवे असे नाही. दाक्षिणात्य राज्यांनी नेमके हेच केले आणि आपल्या भाषेची किंमत ठेवली. महाराष्ट्र यातून कधी बोध घेणार?
[…]