बृहन्महाराष्ट्रातील संस्कृती वैभव – गणेशोत्सव
१९३० ते १९४० या दरम्यान भारतीय रेल्वेच्या सेवेत रुजू झालेली अनेक मराठी कुटुंब दिल्लीत स्थायिक झाली. त्यांच्यासोबत मराठी सण, परंपरा आल्याच. याचवेळी त्यांनी गणेशोत्सवाची परंपराही सोबत आणली. दिल्लीत कामधंदा आणि राजकारण या दोन्हीसाठी मराठी माणसांची संख्या वाढल्यावर महाराष्ट्राचा सार्वजनिक गणेशोत्सव ही उत्सव संस्कृतीही इथे रुजायला लागली. […]