एकांकिका : मला काय त्याचे? (भाग १)
त्यावेळी मी केवळ ५ वर्षांचा होतो. माझी आई थकलेल्या हातांनी मला जेवण भरवत होती “हा घास काऊचा, हा घास चिऊचा, हा घास….”… आणि अचानक वादळ यावं असं कुणीतरी आलं नि मला गर्रकन भिरकावून दिलं. क्षणभर कळलंच नाही काय झालं? मी रडत होतो हुंदके देत होतो. डोक्यातून घळाघळा रक्त वाहत होतं. मला काहीच कळत नव्हतं, काही कळण्यासारखं ते वय नव्हतं. चार-पाच जण माझ्या आईला काहीतरी करत होते. मी मात्र काहीच करु शकलो नाही. केवळ आई आई म्हणून विव्हळत होतो. कळायला लागलं तेव्हा कळलं की माझ्या आईवर धर्मांधांनी बलात्कार केला होता. आईईईई आईईईई (मोठ्याने रडतो)…
[…]