तू आलीस तेव्हां ………
घन काजळ रात्री तू आलीस अन् मूर्तिमंत अंधार मी चिंब तुझ्या प्रकाशात न्हालो…. दंव ओल्या पहाटे तू आलीस अन् प्राजक्ताचा सडा पडलेल्या धरित्रीसारखा मी शांत निवांत झालो…… तू आलीस तेव्हां निखळ कोरडा पाषाण मी चिंब तुझ्या प्रेमात भिजलो. — श्री.उदय विनायक भिडे