कष्टाचे मोल
कष्ट करुनी घाम गाळीतो, शेतामध्यें शेतकरी, समाधानाने मिळते तेंव्हा, त्यास एक भाकरी ।।१।। त्याच भाकरीसाठी धडपडे, नोकर चाकर, कष्टामधूनच जीवन होते, तसेच साकार ।।२।। कष्ट पडती साऱ्यांना, करण्या जीवन यशदायी, विद्यार्थी वा शिक्षक असो, अथवा आमची आई ।।३।। अभ्यासातील एकाग्रता, यास लागते कष्ट महान, त्या कष्टाचे मोल मिळूनी, यशस्वी होईल जीवन ।।४।। […]