अमर भुपाळी (१९५१)
राजकमल कलामंदिर निर्मित हा चित्रपट १९५१ मध्ये पडद्यावर आला. विश्राम बेडेकर यांची कथा, वसंत देसाईंचं सुमधुर संगीत, आणि लता मंगेशकरांच्या आवाजातील अप्रतिम गाणी ही या चित्रपटाची खास वैशिष्ट्ये. या चित्रपटातील होनाजीची प्रमुख भूमिका साकारली पंडितराव नगरकर यांनी. याचबरोबर संध्या, ललिता पवार, भालचंद्र पेढारकर यांच्या भूमिका आणि व्ही शांताराम यांचं दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट सदाबहार चित्रपटांपैकी एक अशी ओळख निर्माण करुन गेला.
[…]