चि. मानसीस
थांबव मानसी, चक्र वाढीचे कळ्यातूनी तू फुलताना हासत खेळत तुरु तुरु चालणे शिशू म्हणूनी जगताना कौतुकाने ऐकतो तुज शब्द बोबडे बोलताना हरखूनी जातो चाल बघूनी हलके पाऊल पडताना आनंद पसरे सभोवताली इवल्या त्या प्रयत्नानी बदलूनी जाईल क्षणात सारे रुळलेल्या तव हालचालीनी तुझ्यासाठी जे नवीन होते प्रयत्न तुझा शिकून घेणे अपूर्णतेची आमुची गोडी लोप पावेल पूर्णत्वाने डॉ. […]