जनरिक औषधांची कास धरू या!
नवीन औषध शोधण्यासाठी शेकडो डॉलर्स खर्च झाल्याने औषधांच्या किंमती वाढतात असा दावा केला जातो. पण लंडन स्कूल ऑफ ईकॉनॉमिक्स – सोसायटीज याननियतकालिकातील संशोधन निबंधाने उघडकीला आणले आहे, की एक औषध शोधण्यासाठी १३० कोटी डॉलर्स नव्हे तर फक्त ६ कोटी डॉलर्स लागतात! दुसरे म्हणजे युरोप – अमेरिकेत औषधांसाठी होणार्या मूलभूत संशोधनांपैकी बरेचसे सार्वजनिक पैशातून होते. सहसा शेवटचा टप्याचेच संशोधन खासगी कंपन्या करतात.
[…]