मराठी- इंग्रजाळलेली की मराठमोळी ?
माझिया मराठीची परि बोलू किती कौतुके।
परि अमृतातेतही पैजा जिंके ।।
असे रसपूर्ण वर्णन असणार्या मराठी भाषेने आपला हक्काचा दिवस २७ फेब्रुवारीला साजरा केला. या निमित्ताने का होईना पण अनेक इंग्रजी भाषिक महाराष्ट्रीय लोकांनी मराठीचे गोडवे गायले….अनेक वृत्तपत्रांनी तर संपूर्ण पुरवण्याच या भाषेसाठी देऊ केलेल्या. खुद्द मराठी भाषेलाच स्वत: ‘सेलिब्रिटी’ झाल्यासारखं वाटलं असेल.
फक्त मराठी भाषा दिनालाच मराठीचे पुरवणीभर गोडवे गाण्यापेक्षा रोज अभिमानाने शुद्ध मराठमोळ्या मराठीत संवाद साधूया आणि अभिमानाने सांगूया, हो ! आम्ही मराठी आहोत. आम्ही ‘महाराष्ट्रियन्’ नाही, आम्ही ‘महाराष्ट्रीय’ आहोत.
[…]