तहानलेले सावरकर
स्वतःला हिंदुसंघटक म्हणवून घेणे सावरकरांना अधिक प्रिय असले तरी प्रत्यक्षात सावरकर हे मानवतावादी होते. त्यांचे आचरण, त्यांचे बोलणे वैयक्तिक आयुष्यात अगदीच साधे होते. कवी मनाचे तर ते होतेच. हे इतकं असूनही ते क्रांतिकारक होते. सावरकरांनी केलेले अस्पृश्योद्धाराचे कार्य पाहिले तर हा माणूस खरोखरच महात्मा किंवा महामानव आहे असे आपल्याला दिसून येईल. सावरकरांनी जवळजवळ ५०० मंदिरे अस्पृश्यांसाठी मुक्त केली आहेत.
[…]