वसंत पंचमी – एक आनंदोत्सव
काल वसंत पंचमी होती, सकाळी गल्लीत एके ठिकाणी सरस्वती पूजा होत होती. बर्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आठवली, गाडीतून दिल्लीला परतत होतो. सकाळची वेळ होती. खिडकीतून बाहेर बघत होतो, सर्वत्र दूर दूर पर्यंत शेंतात पिवळ्या फुलांनी नटलेली सरसों दिसत होती. अचानक धुक्याचा परदा चिरत सूर्य नारायणाने दर्शन दिले. सूर्याच्या सोनेरी प्रकाशात, धरती न्हाऊन निघाली. असे वाटले जणू धरतीमातेने […]