नवीन लेखन...

पाकिस्तानला अद्दल घडवा : हुरियतच्या नेत्यांवर देशद्रोहाचा खटला चालवा

सत्तेवर आलेले जम्मू-काश्मीरमधील पीडीपी-भाजप यांचे आघाडी सरकार स्थिर होण्याच्या आत दहशतवादी रंग दाखवू लागले आहेत. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ‘शांततेत मतदान पार पडू दिल्याबद्दल’ मुफ्ती महंमद सैद यांनी मानलेले आभार ‘लष्करे तोयबा’ चे बोलविते धनी विसरले असावे. नाही तर लागोपाठ दोन दिवस भीषण हल्ले करून दहशतवाद्यांनी जम्मूत रक्ताचे सडे घातले नसते. आधी दहशतवाद्यांनी कथुआ जिल्ह्यातील पोलिस ठाण्यावर […]

मला कळलेला रावण

आजीने सांगीतलेली कथा   आज मला अचानक माझ्या स्वतःच्या सत्तर वर्षे वयाच्या आजीची आठवण आली. अतिशय प्रेमळ व आम्हा नातवंडावर जीव लावणारी ती होती. माझ्या वयाच्या चौदा वर्षे पर्यंत मला तीचा सहवास लाभला.  आजींच्या दोन गोष्टी मला फार आवडायच्या. एक चांगले चटकमटक खावयास नेहमी देणे. दुसरे रोज रात्री झोपण्यापूर्वी कथा सांगणे. रामायण, महाभारत यातील छोट्या छोट्या […]

अनर्थ

अर्थेचा लाविती अनर्थ ही अनर्थात अर्थ शोधिती माकड वानर मानवजात ही असामान्यता मानिती डरकाळी फोडिता तयाला शेर इ काश्मिर म्हणती आणि तमाने लाभ मारिता गर्दभ पदी स्थापिती कशी ही उलटी जनता रिती ।।१।। नरेचि केला नारयण जगी दांभिक जन फसती नारायण न वसे जगी या नाते आकाशी परंतु जेव्हा येता लग्ना स्वसुता सौदामिनी जातो कोठे विश्वभाव […]

रेणूके जगदंबे आई

रेणूके जगदंबे आई रेणुके जगदंबे आई    दर्शन दे मजला तुझ्या मंदिरी आलो   पावन हो तू भक्तिला    ।।धृ।। तुझे अजाण बालक    करितो खोड्या अनेक न होई चित्त एक तूंच समजोनी घेई    मम चंचल मनाला   ।।१।। रेणूके जगदंबे आई, दर्शन दे मजला जमदग्नीची कांता    परशूरामाची तूं माता मनीं तुजला भजतां आशिर्वाद तूं देई     आनंदानें सर्वांला  ।।२।। रेणूके जगदंबे […]

सुप्रजनन – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

गर्भावस्थेत किंवा प्रसूतीच्या दरम्यान माता-बालक मृत्यूचे प्रमाण अन्य देशांच्या तुलनेत भारतात सर्वाधिक आहे. लोकसंख्येच्या मानाने अपुऱ्या वैद्यकीय सुविधा हे त्याचे एक महत्वाचे कारण नक्कीच आहे. त्याशिवाय मुलीचे लग्नाचे वय हा देखील दुसरा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. आयुर्वेदानुसार पुत्रप्राप्तीसाठी मुलीचे वय १६ वर्ष तर मुलाचे २१ वर्ष असावे. ह्या वयात गर्भधारणा झाली तर होणारे अपत्य सुदृढ होण्याची शक्यता सर्वात जास्त असते.  शिक्षणाचा […]

हिंद महासागर भारताच्या सामरिक हिताकरता महत्वाचे क्षेत्र

सेशेल्स, मॉरिशस, श्रीलंका, मालदीव लहान देश भारताकरता महत्त्वपूर्ण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ११-१४ मार्चचा सेशेल्स, मॉरिशस आणि श्रीलंकेचा दौरा, प्रदीर्घ काळापासून उपेक्षित हिंदी महासागरातील देशांशी संबंध वाढविण्याचे पाऊल आहे. सेशेल्सची एकूण लोकसंख्या ८७ हजार आहे.११५ लहान-लहान बेटांनी बनलेल्या सेशेल्सचे एकूण भौगोलिक क्षेत्र ४५५ वर्ग किलोमीटर आहे. सेशेल्स हिंद महासागरातील एक लहानसे मात्र सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे द्विप […]

किती इंधन फुकट घालवायचं ?

या टोलधाडीसाठी देशाचं किती नुकसान करायचं त्याला काही limit आहे की नाही? प्रत्येक टोल नाक्यासमोर ही मोठी लाईन. सगळी वाहने पहिल्या गियरमध्ये चालतायत आणि लिटरवारी पेट्रोल-डिझेल फुकट घालवतायत. कुठेतरी थाबायलाच पाहिजे हे सगळं… निवडणूका लढताना टोलमुक्य महाराष्ट्राची आश्वासनं दिलीत ती गेली कुठे?

कंटाळा आला आता या टोलचा

खरं आहे. या टोलचा आता कंटाला आलाय. नुस्ते पेसे जातात म्हणून नाही तर वेळ किती फुकट जातो? एकदाच काय ते वर्षभराचे पेसे घ्या आणि आम्हाला या रोजच्या कटकटीतून वाचवा…

महाराष्ट्राची नवी टोल (धाड) संस्कृती

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे आणि मुंबईतले ५५ पूल बांधल्यावर तिथे जो टोल नावाचा राक्षस ऊभा झाला तो त्यानंतर शांत झालाच नाही. आता महाराष्ट्रात टोल संस्कृती चांगलीच रुजलेय. कोणी कितीही ओरडलं तरी टोल बंद होण्याची शक्यताच नाही. नव्या सरकारला सहा महिन्यातच याची प्रचिती आली आणि आता तर त्याची कबुलीच सरकारने दिली. […]

निघाली घुमानची गाडी..

कदाचित पुढचं साहित्य संमेलन “फुकट” करुन घेण्यासाठी थेट “फुकेट”लाच ठेवतील. चला फुकटात फुकेत ची वारी करायला… […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..