गरिबांची गाडी – सिंहावलोकन
मुंबईवरील इंग्रजी सत्तेची पहिली चाळीस वर्षे लोटल्यावर साधारपणे १७१० नंतर – रोग, परकीय आक्रमणे इ. संकटांचे भय बरेचसे ओसरले होते. बळ आणि आत्मविश्वास हे गुण वाढले तेव्हां काहीशा निर्भयपणाने इंग्रज प्रगतीचा मार्ग आक्रमू लागले. जमिनीवर होणाऱ्या समुद्राच्या लढाईला लगाम घालून ती थोपविण्याचे जमल्यावर शहरे वाढू लागली. नवीन रस्ते तयार केले गेले आणि पालखी हे वाहन पुष्कळच […]