मोबाईल लाईफस्टाईल
अतिशयोक्ती वाटेल… पण हे काही दिवसात प्रत्यक्ष बघायला मिळणार आहे…. आई स्वयंपाकघरात, बाबा हॉलमध्ये, मुलगा त्याच्या खोलीत, ताई कुठेतरी बाहेर, आजोबा-आजी त्यांच्या खोलीत. पण एकमेकांशी गप्पा मारताहेत. चक्क WhatsApp वरुन. प्रत्येक कुटुंबाचा एक स्वत:चा ग्रुप असेल. तसा बर्याच कुटुंबांनी आत्ताच बनवलाय. त्या ग्रुपवरुनच आई सांगेल… “चला जेवायला”. बाबा कदाचित चिंटूला विचारतील “अभ्यास झाला का रे बाबा?”. […]