नवीन लेखन...

कवच

आघात होऊनी परिस्थितीचे, सही सलामत सुटत असे, संकटाची चाहूल लागूनी, परिणाम शून्य ठरत असे ।।१।। दु:खाची चटकती उन्हे, संरक्षणाची छत्री येई, कोणती तरी अदृष्य शक्ती, त्यास वाचवोनी निघून जाई ।।३।। दूर सारूनी षडरिपूला, मनावरती ताबा मिळवी, प्रेमभाव अंगी करूनी, तपशक्तीला सतत वाढवी ।।३।। तपोबलाचे बनूनी कवच, फिरत होते अवती भवती, दु:खाचे वार झेलुनी, रक्षण त्याचे सदैव […]

नशीब

का असा धांवतोस तूं , नशिबाच्या मागें मागें, यत्न होता भगिरथी, नशीब येईल संगे ।।१।। प्रयत्न होतां जोमाने, दिशा दिसताती तेथें, यशाचे ध्येय सदैव, योग्य मार्गानें मिळते ।।२।। प्रयत्न करूनी बघा, ईश्वर देखील मिळेल, इच्छा शक्ती प्रभावानें, नशीबही बदलेल ।।३।। डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

शून्य कचरा परिसर !

सध्या मुंबईची लोकसंख्या दीड कोटींच्यावर आहे आणि त्यात रोज वाढच होत आहे त्यात दररोज जमा होणारा कचरा कित्येक मेट्रिक टन आहे. तसेच सातत्याने वाढणाऱ्या झोपडपट्ट्या, गृहसंकुलं त्यामुळे त्यात होणारी कचऱ्याची वाढ, त्याचे व्यवस्थापन आणि विल्हेवाट लावण्यासाठी होणारा कैक कोटींतील खर्च, डंम्पिंग ग्राऊंडच्या समस्या, ढिसाळ कारभार, भ्रष्टाचार, नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी आणि त्यावरील तोकडे उपाय अश्या सगळ्यातून मार्गक्रमण […]

भावंडे जुळी दोन

देवाने दिली आपणास बाळे जुळी दोन, पाठीला पाठ लाऊन जन्मास आली जणू एकाच नाण्याच्या बाजू दोन ! एक बहिण आणि एक भाऊ नामकरण करती त्यांचे तृप्ती आणि समाधान ! जुळ्यांना समजावून घेतना होते मनाची कसरत, मीमी तूतू ने गाडी नाही पुढे सरकत ! प्रेम करता एकावर रुसवे दुसरे उगाच, दुसऱ्यास जवळ घेता पहिले पाहे रागेच ! […]

आईच्या प्रेमाचं समीकरण

एका कॉन्फरन्ससाठी मी दिल्लीला गेलो होतो. दुपारचा वेळ मोकळा होता. मी निवांत बसलो होतो. हातात फाइल्स घेतलेला एक तरुण मुलगा माझ्याकडे आला आणि म्हणाला,“सर ओळखलं?” अर्थातच मी ओळखलं नाही. म्हणाला,”चला चहा घेऊ. ”परप्रांतात मराठी माणूस भेटला की बरं वाटतं. “इथे हॉटेलच्या लिस्टवर मराठी माणसांची नावं शोधली. त्यात नेमकं तुमचंच नाव दिसलं. म्हणून म्हंटलं तुम्हाला भेटूया. मी […]

हॉलिवूड चित्रपटात मराठी कलाकारांचा झेंडा

पुण्याचे सुप्रसिद्ध सतारवादक श्री समीप कुलकर्णी यांनी चक्क एका हॉलिवूड चित्रपटासाठी सतारवादन केले आहे. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक पुण्याचेच श्री मिलिंद दाते हे आहेत. […]

कर्दळीवन परिक्रमा : एक प्रत्येकाने घेण्यासारखा अनुभव

प्रत्यक्ष परिक्रमा एकूण २४ कि.मि.ची आहे..या २४ कि.मि. प्रवासात केवळ आपले पाय हेच वाहन असते..इथे चालण्याला अत्यंत खडतर असा हा प्रवास आपल्या शारिरीक व मानसीक कणखरतेची परिक्षा घेणारा आहे.. […]

देवा तुझा मी सोनार

देवा तुझा मी सोनार माझे काय बरे होणार पैजण होऊ पाहे पायी परंतु घुंगरु वाजलं नाही मग कैसे रुनझुणणार माझे काय बरें होणार? मौतीक माळा होऊ पाही परी मौतीक गुंफत नाही कैसी मी रुळणार माझे काय बरें होणार? कमरपट्टा होऊ पाही चाप बंधनी अडकत नाही कैसी मी कसणार देवा काय बरे होणार? मुकूट मस्तकी होऊ पाही […]

जन्म स्वभाव

गोड शब्द बोबडे, लकब मनास आवडे । शब्दांची भासली जाण, नव्हते भाषेचे अजुनी ज्ञान ।। भावनांचा उगम दिसला, मनी व्यक्त होई हालचालीतूनी । रागलोभ अहंकारादी गुण, दिसून येती जन्मापासून ।। देश-वेष वा जात कुठली, सर्व गुणांची बिजे दिसली । हळूहळू बदले बाह्यांग जरी, उपजत गुण राही अंतरी ।। प्रसंग घडता अवचित , बाह्य जगाते विसरत । […]

आधुनिक अमेरिकन शेती व पशुसंवर्धन – भाग ८

अमेरिकन खाद्य संस्कृतीचे औद्योगीकरण एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी सुरू झाले. याचा प्रारंभ झाला मांसोत्पादनाच्या उद्योगापासून (Meat Packing Industry). मांसोत्पादनाच्या साखळीतला, कत्तलखाना हा एक मोठा महत्वाचा दुवा आहे. सुरवातीला स्थानिक पातळीवर किरकोळ स्वरूपाचा व्यवसाय करणारे कत्तलखाने, मोठे होता होता आपले स्वरूपदेखील बदलू लागले. त्यामुळे कत्तलखान्यांना जसजसं संघटीत व व्यावसायिक रूप येत गेलं, तसतसं त्या साखळीतला केवळ एक दुवा […]

1 8 9 10 11
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..