नवीन लेखन...

सारेच खेळाडू

खेळाच्या त्या मैदानीं, रंगात आला खेळ, मुरलेले खेळाडू, आनंदी जाई वेळ ।।१।। खेळाच्या कांहीं क्षणी, टाळ्या शिट्या वाजती, आनंदाच्या जल्लोषांत, काही जण नाचती ।।२।। निराशा डोकावते, क्वचित त्या प्रसंगीं, हार- जीत असते, खेळा मधल्या अंगी ।।३।। सूज्ञ सारे प्रेक्षक, टिपती प्रत्येक क्षण, खेळाडू असूनी ते, होते खेळाचे ज्ञान ।।४।। मैदानी उतरती, ज्यांना असे सराव, जीत त्यांचीच […]

मैत्रिण

पंचवीस एक वर्षापूर्वी विजय एका सरकारी शाळेत तिसर्‍या इयत्तेत शिकत होता. त्यावेळ्चा प्रसंग आठवून विजयला आजही स्वतःवरच ह्सू येत. त्या शाळेपासून पंदरा मिनिटाच्या अंतरावर असणार्‍या झोपडपट्टीत विजय त्यावेळी रहात होता. पण झोपडपट्टीत रहात असतानाही त्यावेळी विजयच्या वडिलांची आर्थिक स्थिती उत्तम होती. त्यामुळे विजय शाळेत जाताना इतर मुलांच्या तुलनेत जरा जास्तच रूबाबात जात असे त्याचा तो रूबाब […]

प्रभू दर्शन

महिमा कसा प्रभू तुझा आगळा, पावन करसी तूं भक्ताला, नाम न घेतां तुझे मुखी, परि भक्त सख्याला भेटून गेला ।।धृ।। पुंडलीकाची महान भक्ती, माता पित्याचे चरणी होती, त्याची सेवा तुजसी खेचती, कसा उकलू मी ह्या कोड्याला, ।।१।। नाम न घेतां तुझे मुखी, परि भक्त सख्याला भेटून गेला पातिव्रत्य हे दैवत समजूनी, पतिसेवेला घेई वाहुनी, सावित्रीने दिले […]

पाश्चात्य संस्कृती

( बर्‍याच दिवसानंतर विजय आणि अजय हे दोन मित्र भेटलेले असतात आणि हॉटेलातील एका टेबलावर बसून चहा पिता-पिता गप्पा मारत असतात तेंव्हा त्याच्यात झालेला नाट्यमय संवाद ) विजय – ( अजयकडे पाहत ) मध्यंतरी गोव्याला गेला होतास का ? अजय – ( आश्चर्याने ) तुला कसं काय कळल ? विजय – अरे ! कसं काय ? […]

बोल अबोल

जीवनाच्या एका वळणावर जेंव्हा आपल धावण थांबत आणि आता जीवनात मिळविण्याची इच्छा शिल्लकच राहिले नाही असे वाटते आणि आपल्या जीवनात फक्त शांतता उरलेली असते तेंव्हा आपण आपल्या मनाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू लागतो . तो संवाद साधल्यावर आपल्याला जी सापडते ती म्ह्णजे आपल्या मनात कोठेतरी खोलवर दडलेली एखादी खंत असते. प्रत्येकाच्या मनात आपल्या जीवनात काही तरी […]

हट्ट

विजयने त्याच्या लहानपणी ही कधी कोणाशी कोणत्याच गोष्टीसाठी हट्ट केला नव्ह्ता. किशोर अवस्थेतही केला नाही आणि तरूणपणी तर नाहीच नाही. कोणतीही गोष्ट कोणाकडूनही हट्ट करून मिळविण्यापेक्षा ती स्वः कर्तुत्वावर आणि मेहनतीने मिळविण्यावर त्याचा दृढ विश्वास होता. त्याने जर ठरविले असते तर त्याला त्याच्या आयुष्यात बर्‍याच गोष्टी आयत्या अगदी सहज मिळविता आल्या असत्या, त्या प्रकारच्या अनेक संध्या […]

जागतिक शांतता

जागतिक शांतता ही एखाद्या देशात घडणारे खून,चोर्‍या, दरोडे आणि बलात्कार याच्याशी निगडीत नाही. जेंव्हा जगातील कोणत्याही भागात आतंकवादी कारवाया होतात तेंव्हा जागतिक शांतता भंग पावते. पहिल्या आणि दुसर्‍या महायुध्दाच्या वेळी जागतिक शांतता मोठ्या प्रमाणात भंग झाली होती. त्यापूर्वी म्ह्णजे हजारो वर्षापूर्वीपासून जागतिक शांतता कधीही प्रस्थापित झालेली नव्ह्ती. दिडशे वर्षापूर्वीपर्यत जागतिक शांतता ही संकल्पना अस्तित्वातच नव्हती. अलिकडच्या […]

निसर्गावर अवलंबून

कितीही सारी धडपड करशी, लाचार ठरतो अखेरी, जाण माणसा मर्यादा तव, आपल्या जीवनी परी ।।१।। क्षणाक्षणाला अवलंबूनी, जीवन असे तुझे सारे, पतंगा परि उडत राहते, जसे सुटत असे वारे ।।२।। निसर्गाच्याच दये वरती, जागत राहतो सदैव, कृतघ्न असूनी मनाचा तूं, विसरून जातो ती ठेव ।।३।। निसर्गाच्या मदती वाचूनी, जगणे शक्य नसे तुजला, जीवन कर्में करीत असतां, […]

ब्रेड रोल

पटकन होणारा आणि सगळ्यांनाच आवडणारा हा एक ब्रेडचा पदार्थ साहित्य – १ मोठा स्लाईस ब्रेड अर्धा किलो बटाटे २ वाट्या मटारचे दाणे ७ – ८ हिरव्या मिरच्या १ इंच आलं ८ – १० पाकळ्या लसूण ४ चमचे चिरलेली कोथिंबीर १ लिंबाचा रस चिमुटभर खायचा सोडा तेल चवीपुरतं मीठ कृती – बटाटे उकडून सोलून मळून घ्यावे. आलं, […]

मोहमाया दलदल

दलदल होता चिखल मातीची, पाय जाती खोलांत, प्रयत्न व्यर्थ जाऊनी , न होई त्यावर मात ।।१।। सावध होऊनी प्रथम पाऊली, टाळावे संकट, मध्यभागी शिरल्यानंतर, दिसत नाही वाट ।।२।। मोह मायेची दलदल असती, सदैव भोवताली, चुकूनी पडतां पाऊल , खेचला जातो खाली ।।३।। जागृतपणाचा अभाव असतां, गुरफूटत जातो, मोहमायेच्या आकर्षक गुणाला, बळी तोच पडतो ।।४।। वेगवान जीवन […]

1 3 4 5 6 7 11
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..