नवीन लेखन...

क्षण मुक्तीचा

तपसाधना करूनी मिळवी, सत्वगुणाची शक्ती अंगी । त्याच शक्तीच्या जोरावरती, स्थान लाभे त्यांना स्वर्गी ।। शक्ती ऱ्हास जे करिती त्याचा, सारे सुख आणि भोग भोंवतीं । परिणामी तो फेकला जाऊनी, पुनरपी येई याच भूवरती ।। एक दया दाखवी ईश्वर, वातावरणी देऊनी संधी । जन्म मिळे ते त्याच ठिकाणी, कमविले पुण्य ज्याने आधी ।। चक्र खेळ हा […]

शांततेचा शोध

मनाची शांति । मिळेना कुणा कुठें शोधूं ती । प्रश्न सर्वांना ।। जीवन ध्येय । शांततेसाठीं प्रयत्न होय । त्याच्याच पाठी ।। शांतीचे घर । अंतःकरण नसे बाहेर । कधीं चूकून ।। शत्रू शांतीचा । अशांति असे ठिकाणा त्याचा । बाह्यांत वसे ।। विरोधी दोघे । दूर राहती । वाईट बघे । एकमेकाती ।। अशांत वाटे […]

काळ घेई बळी

जात असता गाडी मधूनी, दुर्घटना ती घडली, अचानकपणे एक दुचाकी, आम्हा पुढे धडकली ।।१।। प्रयत्न होऊनी योग्य असे, थोडक्यात निभावले, वखवखलेल्या काळालाही, निराश व्हावे लागले ।।२।। घिरट्या घालीत काळ आला, झडप घातली त्याने, वेळ आली नव्हती म्हणूनी, बचावलो नशिबाने ।।३।। अपमान झाला होता त्याचा, सुडाने तो पेटला, थोड्याशाच अंतरी जावूनी, दुजाच बळी घेतला ।।४।। डॉ. भगवान […]

सुखाचा डब्बा

जगातील वस्तू, वाटे आकर्षक देह सुख देण्या, समजे त्या ठिक…१ प्रत्येक गोष्टीला, डब्याचा आकार सुखाचे वेष्ठन, ते चमकदार…२ चमक बेगडी, फसवी सर्वाला काय डब्यामध्ये, कळेना कुणाला…३ झाकण उघडा, दुःख दिसे आंत लपून बसले, प्रत्येक गोष्टीत…४ हात लावताच, दुःख हाती येई भासलेले सुख, नष्ट होत जाई…५ डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

देह मनाचे द्वंद

दोन स्थरावर जगतो मानव, आंत बाहेरी आगळा । भिन्न भिन्न ते दर्शन घडते, यास्तव कांहीं वेळा ।।१।। एकच घटना परी विपरीत वागणे । दुटप्पेपणाचा शिक्का बसतो, याच कारणे ।।२।। देहा लागते ऐहिक सुख, वस्तूमध्ये जे दडले । अंतर्मन परि सांगत असते, सोडून दे ते सगळे ।।३३।। शोषण क्रियेत आनंद असतो, ही देहाची धारणा । त्यागमधला आनंद […]

मुके भाव

आज लोपले शब्द ओठचे, भावनाच्या आकाशीं प्रखर बनतां त्याच भावना, विचार जाती तळाशीं….१ भावनेला व्यक्त करण्या, सांगड लागे शब्दांची थोटके पडती शब्द सूर ते, गर्दी होता विचारांची…२ भावनांचे झरे फुटूनी, विचार जलाशय झाले विचारांचे बनूनी धबधबे, वाहू मग लागले…..३ आकार देती शब्द भाषा, बांध घालूनी विचाराला निश्चीत होतो वेग नी मार्ग, आकार देता भावनेला….४ भाषेमधली शक्ती […]

आधुनिक अमेरिकन शेती व पशुसंवर्धन – भाग ७

पूर्वी गायीचं दूध हातानं काढावं लागायचं. आता बहुतेक ठिकाणी यंत्रांच्या सहाय्यांनी मिल्किंग पार्लर्समधे गायीचं दूध काढलं जातं. त्यामुळे पूर्वी छोट्या कौटुंबिक फार्म्सवर आई, वडील, मुलं मिळून ३०-४० गायींचं दूध काढता काढता थकून जायची. आता मोठमोठ्या डेअरी फार्म्सवर मिल्किंग पार्लरमधे हजारो गायींचं दूध दिवस रात्र काढलं जातं. बहुतेक डेअरी फार्म्सवर लॅटीन अमेरिकन मजूर हे दूध काढण्याचं काम […]

लज्जा

साडी चोळी सुंदर नेसूनी, आभूषणें ती अंगावरती, लज्जा सारी झांकुनी टाकतां, तेज दिसे चेहऱ्यावरती ।।१।। आत्म्यासम ती लज्जा भासे, सौंदर्य जिवंत त्याच मुळें, लोप पावतां लज्जा माग ती, जिवंतपणा तो कसा कळे ।।२।। लपले असते सौंदर्य सारे, एक बिंदूच्या केंद्रस्थानीं शोध घेण्या त्याच बिंदूचा लक्ष्य घालतां उघडे करुनी ।।३।। विकृत ती मनाची वृत्ती स्वच्छंदीपणात ती असते […]

विश्व पसारा

विश्वामध्ये वावरतां, भोंवती विश्व पसारा । रमतो गमतो खेळतो, जीवन घालवी सारा ।। संबंध येई हर गोष्टींचा, गोष्टी येथें अगणित । प्रत्येक निर्माण करी, आपलेच विश्व त्यांत ।। जीव निर्जीव विखूरल्या, वस्तू अनेक । आगळ्या त्या परि ठरे, एकाचीच घटक ।। विश्वामध्येच विश्व असते, राहून बघे विश्वांत । समरस होता त्याच विश्वाशी, निसर्गमय सारे होत ।। […]

1 9 10 11 12 13 63
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..