2015
मुर्तीतल्या देवा
मातीच्या मूर्तीला देऊनिया एक नाव पुजतो माणूस तुला का हे नाही ठाव || मंदिरात पुजारी घालतो भक्तीवर घाव बाहेर समित्या साधती आपलाच डाव || माणसाला किती रे ही संपत्तीची हाव नावावर तुझ्याच मारती मिशीवर ताव || मूर्तीला तुझ्या आज रे सोन्याचा भाव विसर्जन करुनी विसरतील तुझे नाव || मनी नाही भाव तरी देवा मला पाव अशा […]
सदृढ शरीरी चिंतन
योजना तुमची चुकून जाते, जीवनाच्या टप्प्याची । अखेरचा क्षण जवळीं येतां, आठवण होते त्याची ।। जोम असतां शरीरीं तुमच्या, करीता देहासाठीं । वृद्धत्वाचा काळ तुम्हीं ठेवता, ईश चिंतना पोटीं ।। गलित होऊनी गेली गात्रे, अशांत करी मनां । एकाग्रचित्त होईल कसे तें, मग प्रभू चरणां ।। दवडू नका यौवन सारे, ऐहिक सुखामागें । त्या काळातील प्रचंड […]
यशासाठी प्रयत्नाची दिशा
प्रयत्न करितां जीव तोडून, जेव्हां यश तुम्हा न येई सोडून देता त्याला तुम्हीं, नशिबास दोष देत राही..१ दोष नका देवू नशिबाला, मार्ग निवडले तुम्ही चुकीचे का न मिळाले यश तुम्हां, मूल्यमापन करा प्रयत्नाचे…२ चूक दिशेने प्रयत्न होतां, वाहून जातो सदा आपण यश जेव्हा मिळत नसते, निराश होवून जाते मन…३ पुनः पुन्हा प्रयत्न करूनी, यश न आले […]
मेघांनो पहा एकवार वळून !
मेघांनो पहा एकवार वळून, हातचे काही राखू नका, कोसळताना अडखळू नका, झेपावताना लाजू नका, पडतांना ‘धड-पडू’ असे करू नका, आनंदाने बरसा, मनापासून बरसा ! तुमचा वर्षाव निरंतर सर्व जिल्ह्यांवर, का रे मेघांनो नाराज असे मराठवाडा-विदर्भावर ! एवढं निष्ठुर झालात तुमच्या आईवर, किती विश्वास ठेवला तुमच्यावर ! किती चटके सोसले तिने तुमची वाट पाहून, बळीराजाला समजावता ती […]
शोधूं कोठें त्यास ?
शोधत होतो रुप प्रभूचे, एक चित्त लावूनी । अवंती भवंती नजर फिरवी, श्वास रोखूनी ।। शांत झाले चंचल चित्त, शांत झाला श्वास । ह्रदयनाडी मंद होऊनी, चाले सावकाश ।। पचन शक्ती हलकी झाली, जठराग्नीची । शिथील झाली गात्रे सारी, देह चैतन्याची ।। देहक्रियांतील प्राणबिंदू , असे ईश्वर । समरस होतां त्याच शक्तिशीं, होई स्थिर ।। शोधामध्यें […]
संस्कारा प्रमाणे
समान बल ते असतां समोर, टक्कर त्याची होई सबळ दुर्बल याचा संघर्ष, टळत नेहमी जाई….१, मर्दूमकीचा विचार ठेवूनी, मैदानी उतरी त्याच स्थरावर सारे घडते, मुरले जे शरिरी….२, ज्ञानी लढतो ज्ञानी जनाशी, वाद-विवाद करूनी हात घाईची सिमा परि, तो टाळी विचारांनी…..३, मस्तावले शरिर असतां, धक्का-बुक्की होते देहामधली जमली शक्ती, बाह्य मार्ग शोधते….४, दिसून येतो ऊर्जा वापर, देह […]
ऋतूचे चक्र आणि मन
कडाक्याची थंडी, दात कुडकडुती, हात-पाय गार, काटे अंगी येती नकोसा वाटतो, मजला हिवाळा, वाट मी बघतो, येण्या तो उन्हाळा सुकूनची जाते, हिरवे रान शरिर राहते, घाम निथळून लाही लाही होता, त्रस्त होई जीव, शोधण्या ढग, मन घेई धाव थांबवितो कामे, वादळी वारा, पर्जन्याचा मारा, पडताती गारा पाणी चहूकडे, वाटते सुकावे, वर्षा जावूनी, सुक्यात खेळावे आपल्या जे […]