नवीन लेखन...

वासनेतील तफावत

विपरित वागूनी मन, नाश करीते शरीराचा । वासनेतील तफावत, काळ बनतो इंद्रियाचा…१, उदर भरले असताना, अन्नाला विरोधते पोट । परि अतृप्तता जिभेची, घालते आग्रहाचा घाट….२, मद्य सेवन करीता, झिंग ती येवून जाते । मेंदूतील चेतनेसाठीं, यकृत बिघडूनी जाते…३, नाच गाणे देत असते, सूख नयनां – कर्णाला । शरीर वंचित होते, मिळणाऱ्या त्या विश्रांतीला….४ एक इंद्रियाची वासना, […]

त्यांचे नाते

कोण लागतात माझे, नाते ते ठाऊक नाहीं, देऊनी जातात मात्र, बरेच मजला काहीं ।।१।। विठ्ठल- रामाचा नाद, गुंजन करितो येथें, पवित्र वातावरण, येण्यानी होवून जाते ।।२।। देवाण घेवाण आत्म्याची, आपसामध्यें चालती, शब्द फुलांची गुंफण, त्वरीत होऊन जाती ।।३।। फुले देऊनी मजला, हार गुफूंन घेतात, दोघे मिळूनी तो हार, प्रभूस अर्पूं सांगतात ।।४।। अदृश्य असले नाते, असावे […]

एअर मार्शल पी. एन. प्रधान

भारतीय सैन्यदलात महाराष्ट्राच्या सुपुत्रांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. सैन्यदलातील सर्वोच्च अधिकारपदांवर मराठी अधिकाऱ्यांनी अतुलनीय कामगिरी करून योगदान दिले आहे. एअर मार्शल पी. एन. प्रधान यांच्या नव्या नेमणुकीमुळे महाराष्ट्राचे हे योगदान पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. एअर मार्शल प्रधान यांचे आजवरचे योगदान आणि नव्या अधिकारपदावरील त्यांच्यापुढची आव्हाने याविषयी.. एअर मार्शल पी. एन. प्रधान हे भारतीय हवाई दलाच्या विविध […]

नैसर्गिक आपत्ती आणि त्यानंतरचे पुनर्वसन

नेपाळमध्ये झालेल्या प्रलयंकारी भूकंपाच्या क्लिप्स आणि बातम्या बघितल्याने अंगावर काटा उभा राहीला. भूकंप होण्यामागची काही करणं आपण थोडक्यात बघणार आहोत. खाणकाम हे प्रमुख मानले जाते. काही देशांमध्ये कोळसा, अ‍ॅल्युमिनियम, पेट्रोलियम पदार्थ, ग्रेनाइड आणि अन्य काही खनिज पदार्थांसाठी उत्खनन केले जाते. यासाठी मोठे स्फोट घडविले जातात. उत्खननामुळे रिक्त झालेली जागा भरण्यासाठी भूगर्भात तीव्र कंपने होतात. स्फोट हे […]

श्रावण मनभावन !

सण उत्सवाने भरलेला श्रावण, चैतन्याने, आराधनेने भरलेला श्रावण, सृष्टीच्या नटण्या मुरडण्याचा श्रावण, ऊन-पावसाशी लपंडाव खेळणारा श्रावण, श्रावण मनभावन ! देवदेवतांच्या भजन-पूजनात रंगून जाण्याचा श्रावण, व्रतवैकल्याने, धार्मिक परंपरेने आत्मबल वाढवणारा श्रावण, चांगुलपणा, भाविकता आणि भावुकता जागवणारा श्रावण, माणसांना खुलवणार, नाचवणारा, गाणारा श्रावण, श्रावण मनभावन ! नागपंचमी, जन्माष्टमी, नारळीपौर्णिमा, रक्षाबंधन, मातृदिन आणि पोळ्याचा श्रावण, तरुणी, नाविवाहीतांचा, मंगळागौरीचा श्रावण, […]

जिवंत चित्र

चित्रकला, आणि निबंधाच्या दरवर्षी आंतरशालेय स्पर्धा होतात. या स्पर्धेसाठी प्रत्येक शाळेतून फक्त एकच विद्यार्थी निवडला जाई. यावर्षी रैनाच्या शाळेतून तिची निवड निबंध स्पर्धेसाठी झाली होती. रैनाला वाचनाची आवड आहे. तिच्याकडे गोष्टीची आणि वेगवेगळ्या विषयावरची अनेक पुस्तकं आहेत. तिचे आई बाब तिला वाढदिवशी खूप पुस्तकं भेट देतात. तिला चित्र काढण्यापेक्षा वाचायला, लिहायला अधिक आवडतं. रैनाने शाळेच्या मासिकात […]

कॅफिनेटेड एनर्जी ड्रिंक्सचे दुष्परिणाम

प्रथम आपण एनर्जी ड्रिंक्स म्हणजे काय हे जाणून घेऊया. एनर्जी ड्रिंकची व्याख्या करता येत नाही पण कोणतेही नॉन अल्कोहोलीक ड्रिंक, ज्या मधे कॅफिन, टॉरिन (एक अमिनो असिड) आणि व्हिटॅमिन व बाकी इतर घटक असतात अशा ड्रिंकला एनर्जी ड्रिंक म्हणतात, शारीरिक व मानसिक परफॉर्मन्स सुधारण्यासाठी ही ड्रिंक्स मदत करतात अशा प्रकारे ह्यांचे मार्केटिंग केले जाते. उत्तेजनवर्धक म्हणून […]

गावोगावी गंमत शाळा

‘एकदा काही मुले गांधीजींना भेटायला गेली. गांधीजींनी मुलांना विचारले,’तुमचे शिकण्याचे माध्यम कोणते?’ काही मुले म्हणाली,’हिंदी’ तर काही मुले म्हणाली,’इंग्रजी’. गांधीजी म्हणाले,’अरे या तर आहेत भाषा! मी तुम्हाला शिकण्याचे माध्यम विचारतो आहे?’ आता मुले गोंधळली. मुलांना जवळ घेत गांधीजी म्हणाले,’अरे भाषा, गणित, विज्ञान असा कोणताही विषय शिकण्यासाठी तुम्ही तुमचे हात वापरता का? प्रत्यक्ष अनुभव घेता का? ही […]

1 26 27 28 29 30 63
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..