नवीन लेखन...

आधुनिकता

नवलाईचे विश्व सारे,  नवलाईतच जगते आगळ्याच्या शोधामध्यें,   नव-नवीन इच्छीते ताजे वाटते आज जें,   शिळे होई उद्यांच ते प्रवाही असूनी जीवन,   बदल घडवीत जाते मुल्यमापन बदलांचे,   संस्कारावरी अवलंबूनी परिस्थीतीच्या भोवऱ्यामध्यें,  विचार फिरे क्षणोंक्षणीं मुळतत्व ते राही कायम,   आकार घेई जसा विचार ताजा शिळा भाव मग तो,   ठरविला जाई वेळेनुसार डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

भ्रष्टाचाराचे ग्लोबलायझेशन आणि उपाय !

सर्व जग आणि आपल्या देशाला भेडसावणारा यक्ष प्रश्न आहे तो म्हणजे भ्रष्टाचार. बऱ्याच विकसीत आणि विकसनशील देशांनी सर्व क्षेत्रात प्रगती केली आहे आणि करीत आहेत. पण भ्रष्टाचारख्या शुल्लक गोष्टीचे निर्मुलन अजून तरी कुठल्याच देशाला करता आलेले नाही करण्याची मानसिकता आणि प्रबळ इच्छाशक्तीही नाही. राजकीय नेते, स्वातंत्र्य सैनिक आणि हुतातम्यांनी भारताला ब्रिटिश सत्तेच्या जोखडातून सोडविण्यासाठी जी निस्वार्थ […]

आपणच असतो विठ्ठल आणि आपणच रुक्मिणी…!

सकाळ उजाडली. विठ्ठल अजून झोपलाच होता. एकादशी आळसाच्या पांघरुणात गुरफटली होती. बाहेर पाऊस पडत होता मस्तंपैकी… आणि तेवढ्यात ढोल ताशांचा आवाज कानावर पडला. विठ्ठल ताडकन उठला. आजी बसलेली बाजूला… ‘ढोल ताशे का वाजताहेत?’, त्याने आजीस विचारले. आजी म्हणाली, ‘आज आषाढी एकादशी नाही का… सकाळी शाळेतल्या मुली नव्वारी नेसून नटून थटून गेल्या इथून… आणि आमचा विठ्ठल अजून  […]

घुसमट श्रावणाची……..

आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी, किती चातकचोचीने प्यावा वर्षाऋूतू तरी काळ्या ढेकाळांच्या गेला गंध भरुन कळ्यात काळ्या डांबरी रस्त्याचा झाला निर्मळ निवांत कविवर्य बा.सी.मर्ढेकरांनी श्रावणाचे केलेले हे वर्णन प्रत्येक वर्षी श्रावण आला आठवत राहते. श्रावणाचे हे मोहक रुप कथा कादंबऱ्या, कवितांमधून वाचताना होणारा आनंद कुठे हिरावलाय कोण जाणे? श्रावण सरी कुठे लोप पावल्या? उन पावसाचा […]

देशभक्त – वैज्ञानिक !

असा देशभक्त वैज्ञानिक एकत्र आणि गरिब कुटुंबात जन्माला आला, लहानपणी कष्टाला, पण शिक्षणचा ध्यास नाही सोडला, त्यासाठी पेपरही विकला, डिग्र्या आणि सन्मानांचा गर्व नाही झाला ! असा देशभक्त वैज्ञानिक ज्याने वडिलांच्या संस्कारांचा आणि थोरामोठ्यांच्या सल्याचा आदर केला ! असा देशभक्त वैज्ञानिक ज्याने आयुष्यभर फक्त देशासाचे हीत बघितले देशासाठी काम केले ! देशाला आंतरीक्ष आणि अणू विज्ञान-तंत्रज्ञानात […]

विधी लिखीत

विधी लिखीत असे अटळ त्याच प्रमाणे होई निश्चित कोण बदले मग काळाला प्रभूचा सहभाग असे ज्यांत  ।।१।। राम राज्याभिषेक समयीं असता सर्वजण आनंदी राज्य सोडूनी वनी जाईल जाणले नव्हते कुणी कधीं   ।।२।। नष्ट करुनी सर्प कुळाला तक्षकावरही घात पडे परिक्षिताचे प्रयत्न सारे फिके पडती नियती पुढे   ।।३।। आकाशवाणीचे शब्द ऐकतां हादरुनी गेला कंस मनीं काळाने त्या […]

ज्ञानेश्वराची चेतना

जीवंतपणी घेई समाधी, ज्ञानेश्वर राजा । दु:खी होऊनी हळहळली, विश्वामधली प्रजा ।। सम्राट होता बालक असूनी, राज्य मनावरी । हृदय जिंकले सर्व जणांचे, लिहून ज्ञानेश्वरी ।। आसनीं बसत ध्यान लावता, समाधिस्त झाले । बाह्य जगाचे तोडून बंधन, प्राण आंत रोकले ।। निश्चिष्ठ झाला देह जरी , बाह्यांगी दर्शनी । जागृत आसती प्राण तयांचे,   आजच्याही क्षणी ।। […]

गीता – जीवनाची एक उकल

रणभूमीवर समर प्रसंगी मृत्यु असता सामोरी जीवनांची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी //धृ// अर्जुन असूनी महारथी द्विधा झाली मनःस्थिती सगे सोयरे तेथे बघूनी खालती बसला निराशूनी कसे मारुं मी माझेच सारे भगवंताला प्रश्न विचारी //१// जीवनाची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी कुणीही नाही कुणाचे येथे नाते गोते क्षणिक भासते सत्ता येथे चालते प्रभुची खेळणी सारी ठरते […]

पाकिस्तानी सरकारातील ‘सुलतान’

पाकिस्तानमधील निवडणूक आयोग हा तसा स्वतंत्र म्हणता येईल. त्याच्यावर सरकारी दबाव नसतो, असेही म्हणता येईल. या आयोगाने जाहीर केले की, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरिफ हे पाकिस्तान राष्ट्रातील सर्वात श्रीमंत असे लोकसभा सदस्य आहेत. […]

अमेरिकन शेतीचा इतिहास – भाग – २

कोलंबसने १४९२ साली अमेरिकेचा मार्ग शोधल्यापासून, युरोपमधे या नवीन जगाविषयीचे कुतूहल चाळवले गेले होते. युरोपातल्या त्या काळच्या धार्मिक आणि सरंजामशाही वातावरणाला सामान्य जनता विटली होती. कर्मठ परंपरांनी धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी झाली होती. सरंजामशाहीमुळे, मुठभर गर्भश्रीमंतांच्या हातात सार्‍या जमिनीची मालकी एकवटली होती आणि उरलेली जनता कष्टाच्या व दारिद्र्याच्या ओझ्याखाली पिचत होती. त्यामुळे एका सर्वस्वी नव्या अशा जगाचे […]

1 30 31 32 33 34 63
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..