नवीन लेखन...

श्री सरस्वतीची तसवीर

जीवनांतले चित्र पालटूनी, रंग ते बदलले जनी जनार्दन ठरविले, सारे काय मिळविले ।१। सुंदर तसबीर एक आणली, देवी श्री लक्ष्मीची श्रद्धेचे भाव गुंतविले, पूजा करूनी तिची ।२। शिक्षण घेवूनी ज्ञान मिळविले, कष्टानें सारे शरीर होते चैतन्यमय, आणि धडपडणारे ।३। रंग बधितले जीवनांतील, विविध छटांचे सजविण्यास लागते त्या छटांना, बळ संपत्तीचे ।४। ज्ञान आणि प्रयत्न जेव्हां, एक […]

अमेरिकेतील ऋतुचक्र – भाग २

पाऊस जणू आपल्या बरोबर हिरव्या रंगाचे डबे घेऊन येतो आणि रानावनात ओतत राहतो. रानांत पाचूचा चुरा उधळावा तसं कोवळ्या पानांनी फुललेलं रान सजू लागतं. ठिपक्यां एवढी पानं कले कलेने वाढत, रुपयाच्या नाण्याएवढी, वाटीएवढी किंवा हाताच्या पंजापेक्षा मोठी होत जातात. जमिनीवर हिरव्या गवताचं साम्राज्य पसरतं तस तसे, वाढणार्‍या हिरव्या गवतात आधीच्या वर्षात गळून पडलेली सुकलेली पानं, काटक्या, […]

उर्जा अर्पण

करा सर्वस्व ईश्वरासी अर्पण    त्यांतच मिळेल समाधान, जीवन अग्नी पेटत राही    उर्जा निघे त्याचे ठायीं । उर्जेचे होते रुपांतर      साधत असे कार्य त्यातून, भावनेचा आविष्कार        देई जीवना आकार । व्यक्त करण्या भावना      उर्जा लागे त्यांना, एकाग्र करा मना      सोडूनी सारी भावना । एकाग्र चित्त हेच ध्यान    प्रभू मिळण्याचे साधन, सारी उर्जा ध्यानांत जाई    तीच ईश्वरार्पण होई […]

‘श्रेयसी प्रजा’ काळाची गरज !

सन २००८ ऑगस्ट मध्ये घडलेल्या ‘निकिता मेहता’ घटनेचा मागोवा घेऊन हा लेख लिहिण्याचा प्रपंच. ह्या केसमध्ये गर्भपात विषयक वादात कायद्याला डावलून निसर्गानेच पूर्णविराम दिला. परंतु त्यातील मूळ प्रश्न मात्र कायमच राहिला. जगातील विविध देशांमध्ये हा विषय निरनिराळ्या रूपात चर्चिला जातो. ह्याच अनुषंगाने निकिता मेहता सारख्या केसेसमध्ये पुढे जन्मभर वादविवाद नको म्हणून गर्भपातासारख्या विषयावर जनता संवेदनशील होते. […]

फूलपाखरे नि फुले

रंगबिरंगी सुंदर ठिपके, पंखावरी आकर्षक छटा त्या, मनास मोहीत करी…१, नृत्य पहा कसे चालते, तालबद्ध होवूनी फूलपाखरे बागडती, फुलाफुला वरूनी…२, नृत्याचे आंगण त्यांचे, ते ही सुंदर नि मोहक मखमालीच्या पाय घड्या, दरवाळताती सुवासिक…३, दोघांमधली चढाओढ, नर्तक आणि नृत्यांगणा कोण असे अधिक मोहक, प्रश्न सोडविल कोण ?….४ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail- bknagapurkar@gmail.com

खरे सुख अंतरी

सुख हे मृगजळ, फसविते सर्वांला खेळ चालतो त्याचा, चकविणे मनाला …१, बाह्य वस्तूंचे सुख, क्षणिक असते, मोहून जाता सर्व, लक्ष्य तेच वेधते…२, खरे सुख अंतरी, परि शोधी बाहेरी, चुकीचा हा हिशोब, निराशा करी…३, अंतरातील सुख, नितांत असते एकाच अनुभवाने, जग विसरविते…४ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail- bknagapurkar@gmail.com

सुक्ष्मात अनंत

एकटाच बसलो होतो, खोलीमध्यें शांत करमणूक करीत होते, दुरदर्शन आत..१,   दूरीवरील व्यक्ती बघूनी, शब्द त्याचे ऐके केवळ चावी फिरवितां क्षणी, दृष्य दुजे देखे…२,   जगामधली सर्व ठिकाणें, खोलीत अदृष्य तीं साधनांचा उपयोग करीता, जाण त्याची येती….३,   वातावरण निसर्गाने, व्यापले सर्व जगी सुक्ष्मापासूनी अनंततेचे, गुण एकाचे अंगी….४,   तेथे आहे जे येथेही, व्यापूनी सर्व स्थळी […]

चारोळ्या

१   काळी बायको  (वात्रटिका) काळी तिरळी बायको लाभून, मिळाले खूप समाधान. कसे काय बुआ ?   असे विचाराल तर तिच्याकडे कुणी बघत नाही म्हणून   २   सारेच चोर  (वात्रटिका) हासतात तुला वेड्या ते, पकडला गेलास समजून परि सहानूभूती आहे त्यांच्यात, चोर आहेस म्हणून   ३ माझी नोकरी (वात्रटिका) नकार देत होती माझ्या प्रेमाला, बघून, मी आहे एक […]

अशोक आणि अमिन

रेहमानपाडा हा मुंबईतला मिश्र लोकवस्तीचा भाग.रेल्वेलाईनच्या कडेकडेने अजगरासारखा पसरलेला. नोकरी मिळेल,रोजगार मिळेल,पोटाची टिचभर खळगी भरेल ह्या आशेने भारतातल्या अनेक भागातून कामसू, जिद्दी माणसं मुंबईत येतात. आणि मग, अगदी अडचणीच्या ठिकाणी पण झोपडी बांधून राहतात.दिवस-रात्र कष्ट उपसतात. थकल्यावर अंग टाकायला घराचा सहारा घेतात. रेहमानपाडा पण असाच वाढत गेलेला. इथे अनेक वाकडे तिकडे गल्लीबोळ.त्यात दाटीवाटीने झोपड्या,बैठी घरं, दवाखाने, […]

एकत्र सर्पालय व बेडूकालय !

दक्षिण आफ्रिकेत एक प्राणी संग्रहालय बघण्यात आले. निरनिराळ्या प्राण्यांची वेगवेगळी दालने बघितली. एकप्रचंड असे सर्पाचे दालन होते.  अति विशाल हौद, तळामध्ये दोन भाग केलेले. पाणी व जमिनिसाठ्यी. लहान मोठी झाडे,  दगडाच्या शीला, काही ठिकाणी कृत्रिम वारुळे, आणि निरनिराळे खांब रोवले होते. अनेक जातीचे सर्प, पाणी व जमिनीवर मुक्त हालचाली करताना दिसत होते. अश्च्यर्याची गोष्ट म्हणजे त्या पाण्यात खूप मासे सोडलेले होते, तसेच बऱ्याच संखेने बेडूक देखील होते. दोन्हीही सापांचे खाद्य. परंतु त्यांचीही प्रजनन क्रिया देखील वाढत राहावी,  ह्याचेपण वातावरण आयोजकांनी व प्रशासनांनी निर्माण केलेले होते. गंमत वाटलीकी साप व त्याचे खाद्य बेडूक व मासे एकाच वातावरणात जीवन  कंठीत होते. ज्याप्रमाणे आम्ही जंगलात वाघ सिंह आणि त्याच वेळी  हरीण झेब्रे ह्यांचेही कळप हे ही बघितले. जीवन मरणाचा आनंद व संघर्ष यांची कला निसर्ग  शिकवतच असतो. वेटोळे घालून शांत पडलेले वा  हालचाली करणारे अनेक सर्प, दिसत होते. आश्च्यर्याची गोष्ट म्हणजे कित्येक बेडूक हे तेथील सापावरही  आरूढ होऊन बसलेले  […]

1 35 36 37 38 39 63
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..