कमल हासन
यशाचा, अपयशाचा, कारकीर्दीचा विचार करणारे अनेक अभिनेते असतात. अभिनयाचा आणि आपल्या व्यक्तिरेखेचा विचार करणारे अभिनेते अभावानेच आढळतात. कमल हासनचा समावेश असाच ‘विचारी’ अभिनेत्यांमध्ये करावा लागेल. तो प्रत्येक व्यक्तिरेखेचा, कथानकाचा तपशिलात जाऊन विचार करतो आणि भूमिकेची त्यानुसार रचना करतो. कमल हासनच्या या अभिनय वैशिष्ट्याचं दर्शन घडविणारा एक छोटासा चित्रपट महोत्सव दिल्लीत झाला. कमलच्या अभिनय कारकीर्दीला पन्नास वर्षे […]