नवीन लेखन...

बिन भांडवली किंवा अल्प भांडवली व्यवसाय

उद्योगव्यवसाय म्हटला की त्याला तीन प्रकारच्या भांडवलाची आवश्यकता असते. 1) पैशांचे भांडवल 2) वेळेचे भांडवल 3) मनुष्यबळाचे भांडवल अनेक जणांकडे पैशांचे भांडवल उपलब्ध नसते. पण त्यामुळे काळजी करू नये.कारण वेळेचे व मनुष्यबळाचे भांडवल प्रत्येकाकडेच उपलब्ध असते. पण त्याची जाणीवअनेकजणांना नसते. हे भांडवल किती प्रमाणात उपलब्ध असते ते बघुया. प्रत्येक माणूस दिवसा कमीत कमी आठ तास तरी […]

तवा

या तव्यावरची भाकरी नाही निर्लेपला ऐकायची | कारण सरावलेल्या हातांनी तीला सवय होती फिरायची ||१|| ठरावीक ठिकाणी दाबल्यावर ती टच्च अशी फुगायची | दोनच चिमटीत धरुन अलगतशी तुटायची ||२|| तशीच जीवनाची भाकरी बाई तीला लेपनाची गरज नाही | कुठे फुगायचे कुठे ओसरायचे हे तिच्यावर अवलंबून नाही ||३|| सराईत हात दिसणार नाहीत चिमटीतून कधी सुटणार नाहीत | […]

साबुदाणा – समज आणि गैरसमज !!

चातुर्मास सुरु झालाय आणि सहाजिकच उपवासाचे दिवसही. आषाढी एकादशीही आली.  महाराष्ट्रात लाखो लोकांचा हा उपवासाचा दिवस. “एकादशी- दुप्पट खाशी” असा वाक्प्रचार या आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रचलित झालाय. कारण सहाजिकच आहे. या दिवशी बर्‍याच लोकांच्या उपवासाच्या थाळीमध्ये अनेक सुग्रास खाद्यपदार्थ असतात. बटाट्याचा किंवा रताळ्याचा कीस, शिंगाड्याचा शीरा, उपवासाच्या भाजणीचे थालिपीठ, राजगिर्‍याच्या पुर्‍या आणि अर्थातच साबुदाण्याची खीर किंवा खिचडी ! […]

फसवे रंग

आज वर्गातलं वातावरण एकदम रंगीबेरंगीच होतं. रंगीत कागद, रंगीत पेनं, पेन्सिली, खडू आणि चित्रविचित्र रंगांची स्केच पेन्स. आणि विशेष गंमंत म्हणजे मुलांनी पण आज रंगीत कपडेच घातले होते. मला काही समजेना? “आज काय सगळ्या मुलांचा वाढदिवस आहे की काय?” असं विचारताच मुलं म्हणाली,“आज कलर डे आहे! म्हणून आज सगळंच कलरफूल!” सिमरन म्हणाली,“आजचा खेळसुध्दा रंगीबेरंगी रंगांचा रंगीत […]

अमेरिकेतील “यु. एस. रुट नंबर ६” – भाग ३

हा ३० मैलांचा रस्ता बहुतांशी ग्रामीण भागातून जातो. फारशी कुठे सपाटी नाही. सगळा उंच सखल, टेकड्या दर्‍यांचा प्रदेश. छोटेखानी डोंगरांच्या, गर्द झाडीने भरलेल्या रांगांच रांगा. रस्ता सगळा घाटाच्या वळणाचा. रस्त्याला समांतर अशी सस्कुहाना नदी वाहते. ही वरती न्यूयॉर्क राज्यातून येऊन पेनसिल्व्हेनीयातून वाहत जाते. टेकड्यांच्या अधून मधून जातांना, काही वेळा ती यु.एस. रूट नंबर ६ ला बिलगून […]

हा जुगार तुम्ही खेळून बघा !

शेतकरी दरवर्षी जुगार खेळतात. हाती असेल नसेल तितके शेतीत गुंतवतात, पाऊस-पाणी चांगले झाले, पिकांना थोडा बरा भाव मिळाला, तर किमान गुंतविले तितके तरी वापस येण्याची आशा असते, नफा हा प्रकार तर त्यांच्यासाठी बादच आहे आणि निसर्गाने दगा दिला, तर होत्याचे नव्हते होऊन तो भिकेकंगाल होतो. परत पुढच्या वर्षी कर्ज काढून असाच जुगार खेळला जातो, एक दिवस […]

अन्नपूर्णा

अन्नपूर्णा दारातून म्हणाली भाकरी दे माई | मी म्हणाले भाकरी नाही ब्रेड देवू कां बाई ||१|| ती म्हणाली भाकरीची चव ब्रेडला येणार नाही | मला मात्र भाकरी करायला वेळच नाही ||२|| एन्जॉयमेंट मधून मला खरं सवडच नाही | ब्रेडपेक्षा भाकरी मला परवडत नाही ||३|| रागावू नकोस तू जा पुढच्या दारी हीच रीत बघशील तू सध्या घरोघरी […]

न्यूट्रीशनचे ज्ञान खेळाची गुणवत्ता सुधारू शकेल का ?

स्पोर्ट्स परफॉर्मन्स मध्ये न्यूट्रीशन महत्वपूर्ण भूमिका बजावते. न्यूट्रीशन ह्या विषयीचे ज्ञान आणि त्यांचा खेळातील परफॉर्मन्स ह्याचा काही संबंध आहे का ह्या विषयी मात्र खेळाडूंमधे स्पष्टता नव्हती असे निदर्शनास आले. न्यूट्रीशन ह्या विषयीचे ज्ञान जितके चांगले तितका त्यांचा न्यूट्रीशन चॉईस चांगला असू शकतो असे ही आढळले आहे. चांगल्या न्यूट्रीशन चॉईस चा फायदा त्यांना त्यांचा फिजीकल फिटनेस मधील […]

गरोदर स्त्रियांसाठी आहार

कुठल्याही स्त्रीला ती गरोदर आहे हे समजताच ती आनंदात फुगून जाते. आपल्या शरीरात एक जीव वाढतो आहे. या गोष्टीवर प्रथम तीचा विश्वासच बसत नाही आणि मुलाला जन्म देणारी हि पहिलीवहिली स्त्री जणू आपणच आहोत. असे क्षणभर वाटण्याएवढा विशेष आनंद तीला होत असतो. आपल्या होणाऱ्या बाळाविषयी ती अनेक स्वप्न बघते, आणि त्या स्वप्नात ती रंगून जाते. परंतु […]

अमेरिकेतील “यु. एस. रुट नंबर ६” – भाग २

आम्ही राहतो ते “क्लार्क्स समीट” हे गाव पेनसिल्व्हेनीयाच्या ईशान्य कोपर्‍यात येतं. पेनसिल्व्हेनीयाचा हा भाग खूप डोंगराळ आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. ह्या भागातल्या डोंगरांच्या रांगांचं नाव “पोकोनो”. हा “अ‍ॅपलाचियन” पर्वतराजीचा एक भाग आहे. अ‍ॅपलाचियन ही काही एक सलग पर्वतराजी नाही. त्यात बर्‍याच छोट्या मोठ्या पर्वतरांगा समाविष्ट आहेत. ही पर्वतराजी कॅनडाच्या आग्नेय भागातल्या न्यू फाउंडलंड भागातून सुरू […]

1 38 39 40 41 42 63
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..