नवीन लेखन...

न्याय मिळेल का न्याय?

या देशाच्या संविधानाने सामान्य लोकांना न्याय देणारे अनेक कायदे, नियम तयार केले आहेत, त्यांचे प्रामाणिकपणे पालन झाले, तरी अनेक पीडितांना सहज न्याय मिळू शकेल; परंतु हे कायदे, नियम बासनात गुंडाळून नोकरशाही आपली समांतर न्यायव्यवस्था चालविते आणि त्यात लाच दिल्याखेरीज कोणतेही काम होत नाही. खरेतर ही अनागोंदी संपविण्याचे काम निस्वार्थी, नि:स्पृह आणि धाडसी राजकीय नेतृत्वच करू शकते. […]

“जागत्या स्वप्नाचा प्रवास” आता इ-बुक स्वरुपात !

सचिन तेंडुलकरच्या सोनेरी कारकिर्दीचा मागोवा घेणारे “जागत्या स्वप्नाचा प्रवास….” हे पुस्तक आता मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी इ-बुक स्वरुपात केवळ रु.९९/- मध्ये उपलब्ध आहे. डबल क्राऊन आकाराच्या तब्बल ४८० पानांचा भरगच्च खजिना असलेल्या या पुस्तकात सुमारे १२५ हून जास्त पानांची सांख्यिकी माहिती दिलेली आहे हे या पुस्तकाचे एक ठळक वैशिष्ट्य. खर्‍या अर्थाने या पुस्तकाला सचिन-कोश असेच म्हणता येईल. मूळ किंमत रु.७००/- असलेल्या या तब्बल […]

अमेरिकतील आमचे फार्मवरचे जीवन – भाग ८

थंडीच्या मोसमात गायींना आत बंदिस्त लाकडी गोठयांमधे घेत असतील, अशी माझी समजूत होती. पण पहिला हिमवर्षाव झाला आणि फार्मच्या जवळून जाताना बघितलं तर सार्‍या गायी नेहमीसारख्या बाहेर उभ्या!  त्यांच्या काळ्याभोर पाठींवर, पांढर्‍याशुभ्र बर्फाच्या झुली उन्हात चमकत होत्या. बर्फाचं, थंडीचं त्यांना काही विशेष अप्रूप असावं असं वाटत नव्हतं. पुढे पुढे मग या दृष्याचीही सवय झाली. फूटफूटभर साचलेल्या […]

लेड पॉयझनिंग – आयुर्वेदाच्या चष्म्यातून 

लेड म्हणजे शिसे धातु, ह्याला संस्कृतमध्ये ‘नाग’ म्हणतात. रक्तात शिसे (लेड) गेल्यावर त्याचे खूप घातक परिणाम होतात हे आपल्या देशातील ‘नॅशनल सेंटर फॉर लेड पॉयझनिंग’ या संस्थेनं सिद्ध केलं आहे. लेडचे रक्तातील प्रमाण किती असावे, किती प्रमाणात वाढल्यास ते घातक समजावे, लेड रक्तात कोणत्या मार्गाने येते,  रक्तातील वाढलेल्या लेडच्या प्रमाणामुळे काय लक्षणे होतात, ते कसे टाळता येईल, वाढलेले प्रमाण कोणत्या औषधाने कमी […]

अमेरिकतील आमचे फार्मवरचे जीवन – भाग ७

मे ते सप्टेंबर पर्यंत शेतं, मक्याच्या आणि सोयाबीनच्या पिकांनी हिरवीगार झालेली असायची. मक्याची रोपं तर चांगली १०-१२ फूटांवर पोहोचणारी. कच्च्या रस्त्यावरून गाडीने जाताना, रस्याच्या दोन्ही बाजूंची वाढलेली रोपं गाडीच्या उंचीच्या वर पोहोचायची. त्यामुळे उभे आडवे रस्ते मिळणार्‍या कोपर्‍यांवर, आडव्या रस्त्यावरून येणार्‍या गाडया दिसत नसत, त्यामुळे आडवा रस्ता आला की गाडीचा वेग हळू करायचा, डाव्या उजव्या बाजूला […]

स्मृती नाहीशी होण्यास ट्रान्स फॅट जबाबदार आहेत का?

ट्रान्स फॅट ही एक प्रकारची अनसॅच्युरेटेड फॅट असून खाल्ल्या नंतर मात्र शरीरात ती सॅच्युरेटेङ फॅट सारखी वागते, आणि म्हणूनच ह्याचा सेवनाने LDL म्हणजे वाईट कोलेस्टरॉल वाढते. ट्रान्स फॅट ही ट्रान्स फॅटी अॅसिड म्हणून ही ओळखली जाते. ही दोन स्वरूपात आढळते. प्राणीजन्य पदार्थातून जसे की जास्त चरबी असलेले मटण, बीफ, कोकराचे मटण, तसेच पूर्ण फॅट असलेले दूध […]

अमेरिकतील आमचे फार्मवरचे जीवन – भाग ६

सुरवातीला वर्षभर आम्ही गावातल्या घरात रहात होतो. मग माझं संशोधन प्रकल्पाचं काम जसं वाढलं आणि संध्याकाळी उशीरा किंवा शनिवार रविवारी देखील जसं काम सुरू झालं, तसं आम्ही कंपनीच्या जुन्या फार्महाऊसवर रहायला गेलो. हे फार्महाऊस साधारणपणे सत्तर वर्षांचं जुनं आणि फारसं निगराणी न राखलेलं होतं. त्याचा उपयोग केवळ आमच्यासारखे काही काळापुरते येऊन प्रकल्पाचे काम करणारे किंवा फार्मवर […]

उकळता प्रयोग

काल हस्तकलेचा तास होता. वर्गातल्या मुलांनी रंगीबेरंगी जाड कार्डशीटचे कागद आणले होते. मुले म्हणाली आज आम्ही या कागदाचा ट्रे करणार आहोत. तर काही मुले म्हणाली आम्ही कागदाचं छोटसं भांडं करणार आहोत. इतक्यात सिमरन म्हणाली, “या कागदातून तुमच्यासाठी काय करू?” आता बाकीची मुलेपण चिवचिवू लागली. “सर्वांनी मिळून माझ्यासाठी, काडेपेटीच्या आकारापेक्षा थोडसं मोठं असं कागदाचं भांडं तयार करा. […]

सर परशुरामभाऊ महाविद्यालय (S P College) – १०० वर्षांचा इतिहास

पुण्यातल्या प्रत्येकच रस्त्याला त्याची स्वतंत्र राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशी ओळख आहे. त्यातलाच एक रस्ता म्हणजे टिळक रस्ता. टिळक चौक आणि स्वारगेट यांना जोडणाऱ्या या रस्त्यावर न्यू इंग्लिश स्कूल, साहित्य परिषद, टिळक स्मारक, अभिनव कला महाविद्यालय, हिराबाग चौक, या वास्तूंच्या बरोबरीने एक वास्तू दिमाखदारपणे उभी असलेली दिसते ती म्हणजे सर परशुरामभाऊ महाविद्यालय. बाहेरून जाणारे काहीजण कुतूहलाने, काही जण नॉल्टेजिक होऊन आणि काही जण इथे येण्याच्या स्वप्नाळू नजरेने त्या दगडी इमारतीकडे बघतात. […]

अमेरिकतील आमचे फार्मवरचे जीवन – भाग ५

सू सेंटरला आल्यावर काही दिवसांतच आम्हाला एक अपार्टमेंट भाड्याने रहायला मिळालं, ते गावातल्या रहिवासी (residential) भागात. मिडवेस्टमधल्या एका छोट्याशा गावात, १०० टक्के जुन्या वळणाच्या अमेरिकन पद्धतीशी आणि जाज्वल्य अशा ख्रिश्चन विचारसरणीशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात, आमचे दिवस चालले होते. आमची कंपनी गायींमधे कृत्रिम गर्भारोपण आणि तत्सम विषयांमधे काम करणारी असल्यामुळे, ऑफिस, लॅब वगैरे सर्व एका मोठया फार्मवरच […]

1 40 41 42 43 44 63
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..