अमेरिकतील आमचे फार्मवरचे जीवन – भाग १
मी पेशाने पशुवैद्यक (Veterinary doctor) आहे. मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून १९८६ साली, ‘पशुप्रजनन’ शास्त्रामधे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून, बरीच वर्षं गुजरातमधे नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (NDDB) ह्या प्रसिद्ध संस्थेच्या, ‘गाई म्हशींमधे कृत्रिम गर्भारोपण’ (Embryo Transfer), ह्या प्रकल्पावर डेप्युटी मॅनेजर म्हणून काम करत होतो. परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याची मनापासून इच्छा होती, पण प्रयत्न करूनही योग जमत नव्हता. […]