परमार्थ व संसार आहेत एकच
उपास तापास करुनी, शिणवित होतो देहाला, भजन पूजन करुनी, पूजीत होतो देवाला । कथा कीर्तनें ऐकूनी, पुराण मी जाणिले, माळ जप जपूनी, प्रभू नामस्मरण केले । वेचूनी सुमनें सुंदर, वाही प्रभूचे चरणीं, फुलांचे गुंफूनी हार, अर्पण केले कंठमणीं । जाऊनी तीर्थ यात्रेत, दर्शन घेतले तीर्थांचे, प्रसिद्ध देवालयांत, चरण स्पर्षिले मूर्तीचे । मनामध्यें ठेऊन शांती, मूल्यमापन केले […]