श्रीरामाची शिवपूजा
हरि हराचे पुजन करतो । दृष्य दिसे बहुत आगळे ।। प्रभूकडूनी प्रभूची सेवा । सर्वजणां ही किमया न कळे ।। शिवलिंगापुढती ध्यान लावी । डोळे मिटूनी प्रभू श्रीराम ।। सुंदर सुबक चित्रामध्ये । व्यक्त होई ह्रदयातील प्रेम ।। श्रीराम प्रभूच्या पूजेवेळीं । आत्मरुप उजळून आले ।। शिवलिंगातील रामस्वरुप । एक होऊनी मग गेले ।। कोण भक्त […]