अमेरिकेतील थॅंक्सगिव्हींग सेल – भाग ४
दुसर्या दिवशी पहाटे चारला उठून प्रातर्विधी उरकून साडेचारपर्यंत घरातून निघायचे होते. लढाईची स्ट्रॅटेजी ठरवता ठरवताच साडेबारा वाजले होते त्यामुळे सगळे जण गजराची वाट पहात पहात झोपी गेलो. पहाटे गजर झाल्यावर एकच धांदल उडाली. सगळेजण लगबगीने तयार होऊ लागले. नोव्हेंबरचा महिना असल्यामुळे कडाक्याची थंडी पडली होती. सगळ्यांनी स्वत:ला गरम कपडयांत लपेटून टाकलं होतं. गुर्जरांचं घर पहिल्या मजल्यावर […]