अमेरिकेतील थॅंक्सगिव्हींग सेल – भाग ३
आमच्यासारखंच आणखीन एक कुटुंब, गुर्जरांच्या घरी येऊन डेरे दाखल झालं होतं. माधवराव आणि नलिनीबाई देशमुख हे साधारण पन्नास पंचावन्नच्या आसपासचं जोडपं आणि नितीन व निकीता ही त्यांची मुलं. देशमुख कुटुंबदेखील आमच्यासारखंच नवशिकं! त्यांचा देखील हा थॅंक्सगिव्हींगचा पहिलाच सेल. गुर्जरांनी तीन चार वर्ष अमेरिकेत काढली असल्यामुळे ते अनुभवी झाले होते. त्यामुळे ओघानेच नेतृत्वाची जबाबदारी अनुपमाकडे आली. “प्लॅनिंग […]