ऊन कधी कलतं झालं
बघतां बघतां ऊन कधी कलतं झालं तें मला समजलंच नाहीं, उमगलंच नाहीं. इवलं होतो मुक्त पाखरूं वारा पिऊन बागडणारं क्षणात रुसणारं-फुगणारं क्षणामधें खुदकन् हंसणारं. होतं हंसू निर्व्याज मोकळं होतं सकाळचं ऊन कोवळं. हळूंच सारं पसार झालं किलबिलतांना कळलंच नाहीं. अचानक येऊन यौवनानं ‘टक्-टक्’ करून केलं जागं आणि उंबरठा ओलांडून मस्तीत राहिलं पुढे उभं. मी स्वार होतांक्षणीं […]