नवीन लेखन...

झगडणारे जीवन

गर्भामधूनी बाहेर पडतां, स्वतंत्र जीवन मिळे  । जीवन रस हा शोषित होती, आजवरी त्याची मुळे  ।।१।।   निघून गेला पदर मायेचा, डोईवरूनी त्याचा  । झेप घेयी तो आज एकला, पोकळीत नभाच्या  ।।२।। दु:ख क्लेशाचे वार झेलले, कुणीतरी त्याचेसाठीं  । आज दुवा नसता सारे पडती पाठी  ।।३।। तेच रक्त परि फिरत होते, शरीरी त्याच्या सारे  । वंशाने […]

स्मृति

जीवनाचा प्रवाह हा भरला आहे घटनांनीं विसरुनी जातो  काहीं काहीं राहती आठवणी  ।।१।। बिजे ज्यांची खोलवर रुतुनी जाई त्या घटना देह आणि मनावर बिंबवूनी जाई भावना  ।।२।। काळाचा असे  महिमा आच्छादन टाकी त्यावरती परि काहीं काळासाठी विसरुनी जातात स्मृति  ।।३।। प्रसंगी त्या अवचित जागृत होती आठवणी पुनरपि यत्न होतो जाण्यासाठीं त्या  विसरुनी  ।।४।। — डॉ. भगवान […]

दारावर भाजी महाग का?

हा लेख ठेल्यावर भाजी विकणार्या भाजीवाल्याच्या स्पष्टीकरणावर आधारित आहे. तसे म्हणाल तर आठवड्यातून २-३ दिवस घराच्या १-२ किमी परिसरात कुठला ना कुठला साप्ताहिक बाजार हा लागतोच. पण नेहमीच अश्या बाजारांंत जाणे जमत नाही.  आठवड्यातून एक-दोनदा तरी आमची सौ. दारावर  भाजी विकत घेते.  भाजीवाला जवळपास  राहणारा आहे.  हा भाजीवाला दररोज ठेल्यावर भाजी सजवून संध्याकाळी ५ ते रात्री […]

चारोळी – लग्न

लग्न म्हणजे प्रारंभात, प्रेम आणि श्रृंगार, लग्न म्हणजे पूर्वार्धात, तडजोड आणि संसार, मध्यंतरात तर लग्न म्हणजे, वाद-वैताग-अंधार, पण लग्न म्हणजे उत्तरार्धात, सोबत आणि गंधार | — सौ. अलका वढावकर

कामवाली

नाही कशी म्हणू, पगार जास्त देते थांब, परी माझे काम सोडून जाऊ नको लांब.. ! नाही कशी म्हणू तुला, तुझा काढते वीमा, फंड पण विरोधात नको माझ्या पुकारुस बंड.. ! नाही कशी म्हणू तुला, T.V. पहा दूपारी, परी आधी माझे काम आणि, मग जा शेजारी.. ! नाही कशी म्हणू तुला, वर्षाकाठी साडी, परी सोसायटीमधल्या मला, सांग […]

आंब्याच्या रसाचे (आमरसाचे) मोदक

साहित्य : हापुसच्या आंब्यांचा रस १ भांडे, पाव भांड्यापेक्षा कमी साखर, खवा, बदाम, पिठी साखर, थोडासा केशर. कृती : हापूसचे चांगल्या क्वालिटीचे आंबे घेऊन त्याचा रस काढावा. तो रस पातेल्यात (जाड बुडाच्या पातेल्यात) ठेवावा. आंबे फक्त सिझनमध्ये मिळतात त्यामुळे हल्ली बाजारात आमरसाचे डबे मिळतात. त्यात अवधूत ह्या नावाचा डबा घ्यावा. ताजे आंबे व डब्यातील रस ह्यामध्ये […]

केळ्याची कोशिंबीर

साहित्य : केळी, हिरवी मिरची, कोथिंबीर, नारळाचा चव, दही, साखर आणि मीठ. कृती : सर्वप्रथम केळी सोलून बारिक चिरणे. त्यात हिरवी मिरची बारिक करुन घालणे. नारळाचा चव, साखर, मीठ, दही व थोडी कोथिंबीर घालून ढवळून घेणे. ही कोशिंबीर उपासाला चालते. — सौ. सुनिता दामले

काळ व कार्याची सांगड

मानव जीवन तुम्हां लाभले, महत् भाग्य ते समजावे कर्म दिधले पाठी तुमच्या, सद्उपयोगी यांसी करावे….१, जीवन रेखा मर्यादेतच, ठेवली असती तुमचे हातीं जाणीव त्याची मनीं असावी, कर्म कार्ये जेव्हां करिती…२, हाती घेतल्या कार्यामध्ये, एकचित्त तो प्रयत्न व्हावा काळ केवढा तुमचे जवळी, याचा विचार सतत यावा…३, कार्ये राहता अपूर्ण अशी, वेळ न उरे तुमचे हाती अभाव असता […]

मॅक अॅण्ड चिझ पास्ता

साहित्य : मॅकरोनी, ५० ग्रॅम बटर, ४ क्युब्स चिझ, ओरिगानो, चिली फ्लेक्स, दिड कप दूध. कृती : सर्वप्रथम पॅनमध्ये ५० ग्रॅम बटर घालून त्यावर दिड कप दूध घालणे. नंतर त्यात चिझ घालून हे मिश्रण घाटून घेणे. त्यानंतर दुसर्‍या कढई मध्ये पास्ता पाण्यात उकडवून तो मऊ झाल्यावर त्यात हे मिश्रण घालणे. त्यानंतर वरुन ओरिगानो व चिलीफ्लेक्स घालणे. […]

गाजराची कोशिंबीर

साहित्य : गाजर, लिंबू, दाण्याचे कुट, तेल, मोहरी, हिंग, हळद, साखर आणि मीठ. कृती : सर्वप्रथम गाजरं किसून घेणे. त्यानंतर त्यामध्ये साखर आणि मीठ घालून लिंबाचा रस घालणे. व त्यावर दाण्याचे कुट घालून हे सर्व मिश्रण एकत्र करुन अर्धा तास ठेवणे. त्यानंतर तेल तापवून ते तापल्यावर मोहरी घालणे. मोहरी तडतडल्यावर हिंग घालून गॅस बंद करणे. व ही […]

1 3 4 5 6 7 10
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..