कोण आहेस तूं कृष्णा ?
सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा ? ।।धृ।। जीवन तूझे ‘बहूरंगी’ सर्व क्षेत्री अग्रभागीं आवडतोस तूं सर्वाना ।।१।। सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा ? दहीं दूध खाई लपून तूप लोणी नेई पळवून ‘खादाड’ वाटलास सर्वांना ।।२।। सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा ? फळे चोरली बागेमधली गोपींची शिदोरी नेली ‘चोर’ वाटलास सर्वांना […]