नवीन लेखन...

प्रमाणित अक्षरचिन्हं आणि लिपी

मराठीतील अक्षरचिन्हे, स्वरमाला आणि व्यंजनमालेविषयी एक विवेचन…. पारंपारिक वर्णमाला : स्वरमाला आणि व्यंजनमाला  पारंपारिक स्वरमाला : अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं (अुच्चार…अनुस्वार) अ: (विसर्ग, नेहमीचा सामान्य अुच्चार…. अहा..), ऋ (र्‍हस्व आणि दीर्घ. दीर्घ ऋ संगणकावर मला टाअीप करता आला नाही), लृ (र्‍हस्व आणि दीर्घ) असे अेकूण १६ स्वर आहेत. पारंपारिक व्यंजनमाला : कंठ्य (Guttural) :: क ख ग […]

आशिर्वाद

मिळवलेस तूं जे जे काही, कौतूक त्याचे सारे करतील स्तुती सुमनातील भाव जमूनी, हृदयामधले दालन भरतील….१ उचंबळूनी जाशील जेव्हां, बांध फुटेल नयनामधुनी ओघळणारे अश्रू सांगतील, भाग्य तुझे ग आले उजळूनी….२ दरवळू दे सुंगध सारा, नभांत जातील यश तरंग स्वर्गांमधुनी  ‘भावू ‘बघतील भीजव त्यांचे सारे अंग…३ (चि. वर्षा विद्यापीठांत सर्व प्रथम आल्याबद्दल) — डॉ. भगवान नागापूरकर

माथेरानच्या राणीच्या निमित्ताने

मुंबई-पुण्याहून माथेरानला पर्यटनासाठी जाणार्‍यांना माथेरानच्या राणीने नेहमीच खुणावले आहे. गेली तब्बल १०९ वर्षे ही राणी दररोज अनेक प्रवाशांना आपल्या कुशीत घेउन माथेरानचा डोंगर चढत-उतरत आहे. दोन-सव्वादोन तासांच्या, २० किलोमीटरच्या प्रवासात गेल्या दोन वर्षात या राणीने जवळपास आठ लाख प्रवासांना माथेरानच्या निसर्गसौंदर्याचे दर्शन घडवले आहे. माथेरान हे ठिकाण पर्यावरणीय पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. या गावात प्रदूषण करणार्‍या […]

पाकिस्तानचे लाख आभार…

हे वाचाल तर हसून हसून वेडे व्हाल…. यॉर्कशायरमधल्या एका माणसाने बर्मिंगहॅममधल्या मित्राला लिहिलेले पत्र… “माझ्या आजूबाजूच्या घरांमध्ये गेले बरेच दिवस चोर्‍या होत होत्या. मी यामुळे अगदी वैतागून गेलो होतो. परिसरात ऑटोमॅटिक अलार्म सिस्टिमची व्यवस्था होती पण तिचा काहीच उपयोग होत नव्हता. शेवटी एकदा मी माझ्या घरातली अलार्म सिस्टिम तोडून टाकली आणि परिसरातील सुरक्षाव्यवस्थेतून बाहेर पडलो. मी […]

पाणीबचतीचा हासुद्धा भन्नाट मार्ग

शाळेतल्या मुलांच्या पाण्याच्या बाटल्या घरी जाताना बहुतेकवेळा अर्ध्या भरलेल्या असतात. घरी गेल्यावर हे पाणी बेसीनमध्ये ओतून टाकलं जातं. ते अर्थातच वाया जातं. हजारो मुलांकडून असं हजारो लिटर पाणी वाया जातं… तेही दररोज. यावर पुण्यातल्या पिंपरीमधल्या एका शाळेने एक नामी शक्कल लढवली. “सिटी प्राईड स्कूल” ही ती शाळा. त्यांनी असा नियम केला की सगळ्या मुलांनी घरी जाताना […]

शिव दुग्धाभिषेक – सत्य घटनेवर आधारित

सन १९७०-७२चा काळ.  जुन्या दिल्लीत  नवी बस्तीतून एक गल्ली नया बाजार कडे  जाते, त्या गल्लीत एका घरात राधा-कृष्णाचे  मंदिर होते. मंदिराच्या  प्रांगणात  शिवपंचायत हि होती. भक्त गण आधी महादेवाच्या पिंडीवर दुग्धाभिषेक / जलाभिषेक करायचे आणि नंतर राधा-कृष्णाचे दर्शन घेत असे.  मंदिर निजी संपती असली तरी जवळपासच्या भक्तांसाठी   मंदिर सकाळी १० पर्यंत  उघडे राहात होते.  मंदिराच्या […]

स्वयंचे विस्मरण

बाह्य जगीं प्रभूसी शोधतो, विसरे जेव्हा ‘ अहं ब्रह्मास्मि ‘ कांही काळची विस्मृती ही, ईश्वर चिंतनाच्या येई कामी…१, शरिर जेव्हां रोगी बनते, सुदृढतेची येई आठवण प्रकाशाचे महत्त्व वाटते, बघूनी अंध:कार भयाण…२, चालना देयी विस्मरण ते, शोध घेण्या त्याच शक्तीचे उकलन होते मग प्रभूची, स्मरण होता अंतर्यामीचे…३ – डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

विरोधासाठी विरोध नको…

काही मराठी दैनिक मालिकांना हल्ली विरोधाचा सामना करावा लागत आहे, सध्याच्या मालिका हया वास्तवापासून कोसो दूर असतात. त्यामुळे त्या मालिकांतील कथानकांना आणि कथेतील पात्रांना आणि मुळात कथेला किती गंभीरपणे घ्यायचं याचा विचार करण्याची वेळ आता जवळ आलेली आहे कारण आता मालिकांतील कथानकांचा संबंध थेट समाजाशी, जातीशी आणि धर्माशी लावला जावू लागला आहे. हा मालिकांना विरोध करण्याच्या […]

भोक

तुझ्या भिंतीवर मारला खिळा आणि पडला भोक तिला… त्या भोकातून पाहिले तुला पण दिसला चंद्र मला… त्या भोकाला लावला डोळा तेंव्हा दिसला काळोख मला… त्या भोकातूनच मग भिडला तुझ्या डोळ्याला माझा डोळा… त्या भोकातून पाहिले तुला तुही मग पाहिले मला… त्या भोकावर टांगले मला तुही मग टांगलेस तुला… त्या भोकातून दिले तुला तुही दिले प्रेम मला… […]

थोबडा

तुझा थोबडा पाहून मी तुझ्या प्रेमात पडलोच नाही तुला पाहून माझ्या हृद्याचे ठोके चुकले पहिल्यांदाच… मला वाटते तुझे आणि माझे काही नाते असावे गतजन्मीचे पण ते नाते प्रेमाचे नाही तर कदाचित असावे शत्रूत्वाचेच कारण क्षणात माणसांना भुरळ घालणार्‍या मला तुझ्या मागे उगाचच धावत राहावे लागलेच नसते वर्षानुवर्षे वेड्यागत… © कवी – निलेश बामणे ( एन.डी.)

1 2 3 4 5 7
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..