निरोप
तिक्ष्ण दृष्टी दे घारीसम, देवा तिजला । दूरवर बघत राहीन, ती लेकीला ।।१।। लेक चालली निरोप घेवूनी, सासरी । भरल्या नयनी माय उभी, शांत दारी ।।२।। जड पावले पडता दिसती, लेकीची । ओढ लागली त्याच पावलांना, मायेची ।।३।। उंचावूनी हात हालवीत, चाले लेक । जलपडद्यामुळे दिसे, तीच अंधूक ।।४।। वाटेवरूनी जाता जाता, दृष्टीआड झाली । अश्रूपूसून पदराने, […]