कोण हा कलाकार ?
न पोंहचे झेप विचारांची, टिपण्या त्याचेच सौंदर्य अप्रतीम सृष्टीचा तो कर्ता, शोधण्या तयासी मन जाय थवेच्या थवे उडत जातां, पक्षी दिसती आकाशीं विहंगम ते दृष्य भासे, आनंदूनी टाकती मनासी बघतां संथ नदीकडे, लय लागूनी जात असे प्रचंड बघूनी धबधबा, चकीत सारे होत असे ऐटदार तो मयुर पक्षीं, आकर्षक ते नृत्य दाखवी सप्तरंगाचे इंद्रधनुष्य, काळजाचा ठाव घेई […]